सातारा बॉंबे रेस्टॉरंट चौकात खड्यात पावसाचे पाणी साठल्याने प्रवाशांना करावी लागत आहे कसरत.
सातारा बॉंबे रेस्टॉरंट चौकात खड्यात पावसाचे पाणी साठल्याने प्रवाशांना करावी लागत आहे कसरत.
.-----------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
------------------------------
साताऱ्यात बॉंबे रेस्टॉरंटपाशी डांबरी रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून त्या ठिकाणी पावसाचे पाणी साठले असून वाहतूकीस अडचण होत आहे. महिलांना अबालवृद्धाना शाळकरी छोटी मुले यांना रस्ता ओलांढताना कसरत करावी लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात ह्या ठिकाणी पाणी साठत असून पालिकेकडे ठोस उपाय योजना असल्याचे पाहावयास मिळत नाहीयेत. सदर ठिकाणी जवळच पोलीस चौकी आहे, वाहतूक पोलीस सदर ठिकाणी वाहतूक नियंत्रण करतांना पाहावयास मिळतात, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी देखील प्रयत्न करणे तितकेच गरजेचे आहे अशी अपेक्षा सर्व सामान्याकडून व्यक्त होताना दिसत आहे.
Comments
Post a Comment