Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

धैर्यशील पाटील कौलवकर फाउंडेशनचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कौतुकास्पद -- प्राचार्य विश्वास पाटील कौलवकर

 धैर्यशील पाटील कौलवकर फाउंडेशनचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कौतुकास्पद   -- प्राचार्य     विश्वास पाटील कौलवकर.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कौलव प्रतिनिधी

 संदिप कलिकते

-----------------------------------

राधानगरी तालुक्यातील कौलव येथील धैर्यशील पाटील कौलवकर फाउंडेशन हे नेहमीच गुणवंत विद्यार्थी यांच्या पाठीशी आहे फाउंडेशनच्या माध्यमातून गेले वीस ते पंचवीस वर्षे गुणवंत विद्यार्थी तसेच इतर क्षेत्रातही उल्लेखनीय यश  संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि व्यक्तींचा सत्कार करीत आहेत.याहीवर्षी सत्कार समारंभ आयोजित केला होता.         

         आतापासून कष्टाची तयारी ठेवली तर यश निश्चित मिळते हे आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे जिद्द आणि कठोर परिश्रम केल्यास यश लांब नाही भविष्यात सर्वच विद्यार्थ्यांनी आपला यशाचा झेंडा फडकवत ठेवावा असे आव्हान राधानगरी महाविद्यालयाचे  प्राचार्य विश्वास पाटील कौलवकर यांनी केले ते धैर्यशील पाटील कौलवकर फाउंडेशन यांच्यामार्फत केलेल्या सत्कार प्रसंगी बोलत होते

दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे याविषयी पाटील सर यांनी योग्य असे मार्गदर्शन केले

      यावेळी धैर्यशील पाटील कौलवकर फाउंडेशनच्या वतीने  ६५ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.तसेत यावेळी कौलव गावचे सुपुत्र आणि जिल्हा दुध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष  के द पाटील कौलवकर यांना महाराष्ट्र , कर्नाटक, गुजरात,गोवा या राज्यांचा राष्ट्रीय आदर्श सहकाररत्न पुरस्कार  मिळाल्याबद्दल तसेच प्रा विश्वास पाटील कौलवकर यांची राधानगरी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झालेबद्दल फाउंडेशन मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमावेळी फौंडेशनचे अध्यक्ष आणि भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक धैर्यशील पाटील,कौलवकर बाबुराव पाटील, शिवाजी पाटील, सदाशिव पाटील,शांताराम चरापले, संजय बरगे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रास्ताविक प्रा आर बी पाटील यांनी केले तर आभार पप्पू चरापले  यांनी मानले

Post a Comment

0 Comments