लोहा येथील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ.
लोहा येथील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
--------------------------------
पोलीस विभागामध्ये 33 वर्ष सेवा देऊन निवृत्त झालेले ए एस आय अशोक केंद्रे यांचा पोलीस स्टेशन तर्फे सहकुटुंब यथोचित सत्कार करण्यात आला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी त्यांना शाल श्रीफळ देऊन सहपतनिक योग्य तो आहेर करून भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
त्यांनी दिलेल्या अहोरात्र सेवेबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले
पोलीस स्टेशन लोहा तर्फे त्यांची लोहा शहरातुन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
पोलीस वाहनासह त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्यात आले आणि त्यांना निरोप देण्यात आला.
लोहा पोलिस स्टेशन तर्फे निरोप समारंभाराचा कार्यक्रम पोलीस निरीक्षक चिंचोलीकर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आयोजित केला होता.
Comments
Post a Comment