Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री शिवाजी विद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी.

 श्री शिवाजी विद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी.

-----------------------------------------

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

-----------------------------------------

 श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये उपप्राचार्य संजयराव नरवाडे शिक्षक प्रतिनिधी व खुशालराव राठोड, जेष्ठ शिक्षिका शोभा राऊत हे उपस्थित होते. सर्वप्रथम मंचावरील मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे विचार खुशालराव राठोड यांनी व्यक्त केले, त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, स्व.वसंतराव नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ व राजनितीज्ञ होत,ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी झाला. वसंतराव नाईक हरितक्रांती,पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या. महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच जाणीव नव्हती तर, त्यांनी दूरगामी स्वरुपाच्या उपाययोजना सुद्धा राबविल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणून संबोधतात. यावेळी प्राचार्य संजयराव देशमुख व उपप्राचार्य संजयराव नरवाडे यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डिगांबर पाचरणे यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments