Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कामगारांच्या हिताची जबाबदारी ही अथर्वची : चेअरमन मानसिंग खोराटे.

 कामगारांच्या हिताची जबाबदारी ही अथर्वची : चेअरमन मानसिंग खोराटे.

-------------------------------------

चंदगड प्रतिनिधी 

आशिष पाटील 

-------------------------------------

अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना धनादेश तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी वितरण.

       दुदैवी प्रसंग कोणावरही ओढावू नये पण दुर्दैवाने अशा प्रसंगाला सामोरे जावे लागल्यास कामगारांसह कारखान्याशी निगडित सर्वच घटकांच्या सुरक्षितेची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादन अथर्व-दौलत चेअरमन मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले. हलकर्णी कारखाना कार्यस्थळावर आयोजित अपघाती विमा व उपदान रक्कम धनादेश वितरण करून ते बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक एचआर व्यवस्थापक अश्रू लाड यांनी केले.

यावेळी चेअरमन खोराटे म्हणाले, कामगार हा कारखान्यांचा अविभाज्य घटक असून त्यांचे सहकार्य यापुढील काळातही मिळावे, असे आवाहन त्यांनी केले. कारखाना हा सभासदांचा, शेतकऱ्यांचा असून तेच कामगार देखील आहेत. त्यामुळे त्यांनी केलेलं सहकार्याने त्यांनाच लाभ होणार आहे. हा कारखाना जसा माझ्याकडे आला त्याहीपेक्षा मोठा आणि सुस्थितीत तो सभासदांच्या हातात पुन्हा सुपूर्द करायचा आपला मानस असून त्यासाठीच आपले सगळे प्रयत्न सुरू असून सर्व कामगारांनी सहकार्य करण्याचे आवाहन खोराटे यांनी केले. कामगारांनी शिस्थ पाळून, कोणत्याही व्यसनाच्या आहारी जावू नये, जेणेकरून कोणताही दुर्दैवी प्रसंग त्या कुटुंबावर येणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी कामगारांना केल्या. 

अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना विम्याचे कवच तर मिळावेच त्याचबरोबर त्यांच्या पाल्यांना कारखान्याने नोकरीच्या माध्यमातून आधार द्यावा, अशी अपेक्षा अँड. संतोष मळविकर यांनी व्यक्त केली. तर कामगारांनीही सुरक्षितेला प्राधान्य देऊन काम करावे, अशी सूचना दौलतचे चेअरमन अशोक जाधव यांनी केली. 

यावेळी प्रकाश पांडुरंग केसरकर,  बाळु तुकाराम साबळे, भगवंत अनंत सदावर, चंद्रकांत सहदेव गुरव, तानाजी गोपाळ कांबळे, शिवानंद पवार या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना विम्याचे धनादेश सुपूर्द केले. तर वैजु राणबा गावडे, राजाराम केदारी पाटील, शिवाजी विश्राम सरनोबत, निंगाप्पा नागाप्पा पुजारी, बाळु चाळु पाटील, हणमंत निंगाप्पा पाटील, तानाजी धाकलू साळोखे, प्रभाकर व्यंकु पाटील, कृष्णा सुबराव पाटील, गोपाळ ईश्वर केसरकर, रमेश गुंडू आवडण, शिवाजी कल्लाप्पा पाटील, गोविंद बाबाजी धुमाळे, रमेश गुंडू पेडणेकर, नामदेव सिताराम पाटील, सुरेश गणपती मोरे, बाळु तुकाराम साबळे या निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी रक्कम वितरीत करण्यात आली. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, संजय पाटील, डॉ. भास्कर चौगले, शांताराम पाटील, शिवाजी सावंत, सचिन नाईक, मानसिग पाटील, गणेश रामपुरे, पीआरओ  दयानंद देवण  उपस्थित होते. आभार नारायण पाटील यांनी मानले. 

जुनी एफआरफी मीच देवू शकतो आणि देणारच

शेतकरी, कामगारांचे कोणतेही प्रश्न हे चर्चेने सुटू शकतात. त्यामुळे त्यावर चर्चेतून नक्की तोडगा काढू. तसेच जुन्या एफआरफीचे कारण पुढे करून त्यावर शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश दिला जात आहे. मात्र, तो प्रश्न देखील मीच सोडवू शकतो. ती रक्कम तुम्हाला माझ्याकडून मिळणार आहे, दुसरं कुणीही ते करू शकत नाही आणि ती मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत असून ते देखील मीच करणार असल्याचा विश्वास चेअरमन खोराटे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

Post a Comment

0 Comments