Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांगली जिल्ह्यातील सतरा परमिट बार आठवड्यासाठी बंद.

 सांगली जिल्ह्यातील सतरा परमिट बार आठवड्यासाठी बंद.

------------------------------

मिरज प्रतिनिधी 

  राजू कदम

----------------------------

सांगली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील परमिट रूम व बारची तपासणी केली होती.

जिल्ह्यातील सतरा बारमध्ये विना वाहतूक मध्यासाठी आढळून आला होता. या परमिट रूम बार आठवड्याभरासाठी बंद ठेवण्याची कारवाई उत्पादन शुल्क विभागाने केले . या कारवाईमुळे परमिट रूम बार चालकात खळबळ उडाली आहे.

लोकसभा, निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने परमिट रूम, बरोबर विशेष लक्ष केंद्रित केले होते. या काळात तपासणीत अनेक बालचालकांनी नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यानंतर सहा बारचालकावर कारवाई करण्यात आली होती. परमिट बारच्या तपासणीत 17 ठिकाणी विना वाहतूक मध्ये साठा आढळून आला होता. 

या बारचालकांनी वाईन शॉप मधून मध्य साठा खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित बारचालकावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी. डॉ राजा दयानिधी त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. त्यानुसार आता जिल्ह्यातील सतरा बार आठवड्यासाठी बंद राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्काचे प्रदीप मोठे यांनी सांगितले. या कारवाईमुळे परमिट बार चालकात खळबळ उडाले आहे..

Post a Comment

0 Comments