Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अखेर भाजपा नेते शेखर इनामदार साहेबांच्या प्रयत्नांना यश.

 अखेर भाजपा नेते शेखर इनामदार साहेबांच्या प्रयत्नांना यश.

----------------------------------------

मिरज कुपवाड  प्रतिनिधी 

राजू कदम 

----------------------------------------

भारतीय जनता पक्षाचे नेते मा. शेतकरी इनामदार साहेब व जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. सुमित दादा कदम यांच्या मध्यस्थीने मा. संजय कदम यांचे उपोषण सरबत देऊन सोडविले निवासी जिल्हाधिकारी यांनी भटके विमुक्त समाजाला गृह चौकशी आधारे दाखला देण्याचा निर्णय. 

आपला भारत देश जागतिक महासत्ता बनण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे आपण विकसित भारत मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण हे पण बघितले पाहिजे की आपल्या भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही करायला मशागत नाही भूमी नाही जगायचं तरी कसे जगायचे हा खूप मोठा प्रश्न आपल्या महाराष्ट्र व भारत देशासमोर उद्भवला आहे त्याच्याकडे जातीचे दाखले नाहीत कारण त्या लोकांच्या जन्म कधी नदी नाल्या किनारे तर कधी फुटपाथवर तर कधी पालावर तर कधीच झोपडपट्टीवर तर कधी जंगलात तर कधी रस्त्यावर झाला. त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्रच नाहीतर जन्म दाखला कुठून देणार आणि जन्म दाखलाच नाहीतर जातीचा दाखला कुठून येणार आणि जातीचा दाखलाच नाही तर आरक्षण योजना नोकरी या कसे मिळणार त्यामुळे ते स्वातंत्र्य अगोदर आणि स्वातंत्र्यानंतर ही लँडलेस भूमिहीनच आहेत. 

पूर्ण भारत देशामध्ये त्यांच्या एकही आहेस क्लास वन ऑफिसर नाही आयआयटी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये त्याचे लोक नाहीत पूर्ण भारत देशामध्ये त्यांचा आमदार खासदार मंत्री नाही आजही त्यांचा समाज भिक्ष मागून उदरनिर्वाह करतो मूलमजुरी करून जगतो आजपर्यंत त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि अनेक आयोगांनीही सिद्ध केले आहे की विमुक्त जाती भटक्यात जमाती समाज सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय अति मागास आहे हे सिद्ध झाले.. आज मा. संजय जी कदम पुणे हा युवक गेली सहा वर्षे संपूर्ण देश फिरून भटका विमुक्त समाज जोडण्याचे काम करत आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये सर्वच भटक्या विमुक्त मध्ये जातीचा दाखल्याचा विषय गंभीर आहे 1961 अटीनुसार जन्म नोंद मागितल्या जात आहेत त्यामुळे तीन दिवस झाले श्री संजय कदम यांनी जातीच्या दाखले मिळणे संदर्भात उपोषण सुरू केले होते. दररोज उपोषण स्थळे हजारोंचे संख्येने भटका विमुक्त समाज येत होता आज उपोषण स्थळी मा. शेखर इनामदार साहेब व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश ढंग यांनी उपोषण स्थळे भेट दिली व भटक्या विमुक्त्याच्या व्यथा जाणून घेतल्या..

मा. शेतकरी इनामदार साहेबांनी उपमुख्यमंत्री मा ना. देवेंद्र फडणवीस साहेब व मा. आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याशी फोनवरून सविस्तर उपोषणाची तीव्रतेची जाणीव करून दिले...

जिल्हाधिकारी मा. राजा दयानिधी साहेब निवासी कलेक्टर मॅडम च्या संपर्कात होते.. मा. दिघे साहेब प्रांत अधिकारी तसेच मा. सौ ज्योती पाटील मॅडम निवासी जिल्हा अधिकारी यांनी योग्य पद्धतीने नेते राहुल मोरे शिवाजी गोसावी सर अनिल जाधव तसेच भटक्या विमुक्त्याच्या पदाधिकाऱ्या समवेत चर्चा करून गृह चौकशी आधारे दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला.. निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी झाल्याने उपोषण सोडण्यात आले.. तसेच उपोषण स्थळे पाच दाखले तात्काळ देण्यात आले याप्रसंगी दीपक माने आश्रम वांकर सुजित काटे अर्जुन मधले आदी मान्यवर उपस्थित होते......

Post a Comment

0 Comments