उद्या मा. मुख्यमंत्री आणि मा. उपसभापती यांच्या हस्ते विधान भवनामध्ये होणार महापालिकेला दिलेल्या ॲम्बुलन्स चा लोकार्पण कार्यक्रम.

 उद्या मा. मुख्यमंत्री आणि मा. उपसभापती यांच्या हस्ते विधान भवनामध्ये होणार महापालिकेला दिलेल्या  ॲम्बुलन्स चा लोकार्पण कार्यक्रम.

----------------------------------

मिरज तालुका  प्रतिनिधी 

राजू कदम 

----------------------------------

महापालिकेच्या ताब्यात दाखल झाली पहिली  कार्डियाक ॲम्बुलन्स महापालिका क्षेत्रांत उपलब्धता झाल्याने गरजू रुग्णाची सोय होणार. आयुक्त शुभम गुप्ता 

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या ताब्यात पहिली कार्डियाक रुग्णवाहिका दाखल झाली आहे. आज मा. शुभम गुप्ता यांनी कार्डियाक ॲम्बुलन्स ची महापालिका आवारात पाणी केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती ना. नीलम त्यांच्या निधीतून ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे. 

मा. मुख्यमंत्री आणि म .सभापती यांच्या हस्ते विधान भवनामध्ये या रुग्णवाहिकेचा लोका अर्पण कार्यक्रम होणार आहे. 

सदरची रुग्णवाहिका ही महापालिकेतून गीतांजली सेवाभावी संस्थेला देण्यात येणार असून त्या संस्थेकडून रुग्णवाहिका चालवली आणि सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्या सुनीता मोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती ना. नीलम त्यांच्याकडे पाठपुरावा करून सदरची रुग्णवाहिका मंजूर करून घेतली होती. या रुग्णवाहिकेची किंमत 45 लक्ष इतकी असून सदरची रुग्णवाहिका ही पूर्णपणे वातानुकूलित आहे. या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय असून रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार दर आकारणी केले जाणार आहे. आज महापालिकेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी या रुग्णवाहिकेची पाहणी करीत कंपनीकडून रुग्णवाहिका महापालिकेच्या ताब्यात घेतली. यावेळी शिवसेना नेत्या सुनीता मोरे ,राहुल मोरे, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, कार्यशाळा प्रमुख तेजस शहा, विनायक जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ अलका तोडकर आदी उपस्थित होते. सदर रुग्णवाहिका महापालिकेकडून रीतसर करारपत्र करीत गीतांजली सेवाभावी संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.