वनमहोत्सवांतर्गत" चिंचाबा-भर येथे वृक्षारोपणं कार्यक्रम.

 "वनमहोत्सवांतर्गत" चिंचाबा-भर येथे वृक्षारोपणं कार्यक्रम.

-----------------------------------

रिसोड. प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकुर 

-----------------------------------

सद्धस्थितीत वृक्षारोपणं व संवर्धन ह्याबद्दल व्यापक प्रमाणात जन-जागृती होत आहे,यामध्ये कोणत्याच प्रकारचे दोमत नाही.पुर्वीच्या काळापासून भरपुर शेती उत्पादन घेण्याच्या ईच्छेपोटी कास्तकार धुर्या-बंधार्यावरिल जातीवंत वृक्षांची कत्तल करत होते. पण याउलट आज रोजी त्यापैकीचं अनेक शेतकरी वृक्षारोपणं एक सामाजिक व नैसर्गिक सोहळा समजुन मोठ्या उत्साहाने स्वतःच्या धुर्या-बंधार्यावर वृक्षारोपणं करत आहेत,हि आम्हा सर्वांसाठी फार अभिमानाची बाब आहे,असे मत "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार" प्राप्त गजानन मुलंगे ह्यांनी चिंचाबा-भर येथील आधुनिक कास्तकार रमेश भेराणे ह्यांच्या स्वतःच्या शेतात वृक्षारोपणं कार्यक्रमाच्या दरम्यान व्यक्त केले.कार्यक्रमाकरिता प्रकाश सानप पोलिस पाटील,दत्तराव राजगुरू मा.सरपंच,दशरथ खरबळ मुख्याध्यापक जि.प.शाळा चिंचाबा भर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान आंबा,आवळा,जांभुळ,कडुनिंब,बेल ईत्यादी सोबतच जलद गतीने वाढणार्या व गुरा- ढोरांना लवकर चारा उपलब्ध करून देणार्या सुबाभूळ इत्यादी 241 रोपट्याची लागवड करण्यात आली.वृक्षारोपणं तसेच त्याचे संवर्धन ह्या बाबींना दुजोरा देत त्याचप्रमाणे कोणत्याही व्यसनाचे समर्थन न करता मुलंगे पुढे म्हणाले की,सद्धस्थितीत व्यसनाधिनतेच्या तुलनेत भेसळयुक्त अन्नधान्य आणि रासायनिक पावडर युक्त फळ-फळावळाने जास्तीत-जास्त जनसंख्या रोगग्रस्त होत आहे हे म्हणने चुकिचे होणार नाही.

त्यामुळे प्रत्येक कास्तकाराने स्वतःच्या धुर्यावर कमीत-कमी दोन फळझाडे लावून पर्यावरणं संतुलना सोबतच स्वतःचे, आपल्या परिवाराचे व जनतेचे हित साधावे,अशी विनंती यावेळेस उपस्थितांना करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सौ.मनकर्णा भेराणे,अंकुश भेराणे,भारत क्षिरसागर,विठ्ठल माळोदे,अरूण सानप व शालेय विदयार्थी ईत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.मुख्याध्यापक मदन चौधरी तर आभार अध्यापक गुणवंत थोरात यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.