रिसोड येथे 'अमृत वृक्ष,आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन.
रिसोड येथे 'अमृत वृक्ष,आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी.
रणजित ठाकूर
-----------------------------
रिसोड वार्ता-- वर्षागणिक जागतिक स्तरावरील वाढते तापमान आणि भविष्यकाळात त्याचा सजीव सृष्टीवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता संपुर्ण विश्वामध्ये विशेषकरून भारतामध्ये शैक्षणिक संस्था,सेवाभावी संस्था,ग्रामपंचायत पासुन तर व्यक्तिगत स्तरावरून वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन याबद्दल व्यापक जन-जागृती होत आहे आणि होणे फार गरजेचे आहे.असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे ह्यांनी व्यक्त केले.ते सामाजिक वनीकरण विभाग,वाशिम परिक्षेत्र रिसोड ह्यांनी आयोजित केलेल्या 'अमृत वृक्ष,आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलत होते.कार्यक्रमाकरिता लागवड अधिकारी प्रमोद सानप,वनपाल विष्णु जटाळे,निर्जला डिघोळे,वनरक्षक आर.एस.कदम,आश्विनी मोटघरे,जयश्री लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची व्याप्ती व प्रसिध्दी दूरपर्यंत होण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे आयोजन वर्दळीचे ठिकाण असलेल्या स्टेट बॅंक,शाखा रिसोडच्या प्रांगणात करण्यात आले.सदर्हु रोप विक्री केंद्रावर आंबा,आवळा,उंबर,बेल,जांभुळ,सिताफळ,चिंच,वड,करंज ईत्यादी अनेक प्रकारची रोपे अतिशय माफक दरात उपलब्ध करून देण्यात आली.ह्या प्रसंगी रोपे खरेदी करणार्या वृक्षप्रेमींच्या फक्त नोंदीचं घेतल्या नाहीत तर त्यांना वृक्ष जगविण्याकरिता नम्र निवेदन सुध्दा करण्यात आले.सर्वचं स्तरातील महिला,पुरूषांनी वृक्ष रोपन व संवर्धन चळवळी मध्ये सहभाग नोंदवावा ह्या भावनेने 15 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत अल्पदरात रोप विक्रीची दिर्घ मुदत ठेवण्यात आली.तरि जास्तीत-जास्त वृक्षप्रेमींनी 'अमृत वृक्ष,आपल्या दारी' योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान याप्रसंगी करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अक्षय आडे,शिवाजी देव्हडे,विजय ठाकरे, वृक्षप्रेमी मदन चौधरी,गजानन खंदारे,गजानन जिवने,गुणवंत थोरात,अर्थशास्त्र प्राध्यापक संजय धांडे,सौ.प्रज्ञा धांडे,सौ.निकिता गाडे ईत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.
Comments
Post a Comment