कुंभोज येथील धनगर समाजाचे महाडिक परिवारावर प्रेम महाडिक कधी विसरणार नाहीत -माजी आमदार महादेवरावजी महाडिक.

 कुंभोज येथील धनगर समाजाचे महाडिक परिवारावर प्रेम महाडिक कधी विसरणार नाहीत -माजी आमदार महादेवरावजी महाडिक.

------------------------------------------ 

हातकणंगले प्रतिनिधी

विनोद शिंगे

------------------------------------------ 

       कुंभोज तालुका हातकणंगले येथील बिरदेव  हिवरखान हे जागृत देवस्थान असून त्या देवाच्या आशीर्वादाने आज पर्यंत महाडिक कुटुंबीयांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे .कुंभोज येथील बिरदेव  हिवर खान देवाच्या सर्वांगीण विकासासाठी महाडिक परिवार कधीही कमी पडणार नाही .असे आश्वासन माझी आमदार महादेवराव  महाडिक यांनी दिले. ते छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना येथे कुंभोज येथील धनगर समाजाच्या वतीने कुंभोज जळाची परडी यात्रेला सहकार्य केल्याबद्दल सत्कार प्रसंगी बोलत होते.


     कुंभोज येथील धनगर समाज हा प्रामाणिक असून या धनगर समाजाने महाडिक परिवारावर सतत प्रेम केले आहे. महाडिक परिवाराच्या मोठ्या होण्यात धनगर समाजाचा मोलाचा वाटा असून महाडिक परिवार ते कधीही विसरणार नाही व त्यामध्ये हिवर खानाचे आशीर्वाद सतत महाडिक परिवाराच्या पाठीशी आहेत. असेही गौरव उद्गार यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक  यांनी काढले यावेळी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश तांनगे, माजी सरपंच कोंडीबा भानुसे,युवा नेते रघु पाटील  चिखली,माजी संचालक बिरदेव तानगे,आकाराम तानगे आदी मान्यवरांच्या वतीने माजी आमदार महादेरावजी महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. बिरदेव यात्रेसाठी महाडिक परिवाराने केलेल्या सहकार्याबद्दल कुंभोज येथील धनगर समाजाने महाडिक परिवार व छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.