आझाद समाज पार्टीमध्ये बहुजन - समाज पार्टी जिल्हाध्यक्ष संजय शिंदे सह इतर पदाधिकारी यांचा जाहीर प्रवेश.

 आझाद समाज पार्टीमध्ये बहुजन - समाज पार्टी जिल्हाध्यक्ष संजय शिंदे सह इतर पदाधिकारी यांचा जाहीर प्रवेश.

-----------------------------------------

 रिसोड प्रतिनिधी 

 रणजीत ठाकूर

-----------------------------------------

वाशिम ; हल्ली दिवसेंदिवस राजकीय चक्र हे कधी गिरकी घेईल हे सागण्यबे म्हणजे भविष्य पाहण्यासारखा आहे. असेच राजकीय वर्तुळात बदल घडवून येत असताना वाशिम मध्ये देखिल हे बदलाव दिसत आहे. आझाद समाज पार्टी मध्ये बहुजन समाज पार्टी जिल्हाअध्यक्ष संजय शिंदे सह इतर पदाधिकारी यांचा जाहिर प्रवेश. व नियुक्ती करण्यात आल्या या मधी संजय शिंदे यांची जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष वाशीम म्हणून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे व महाराष्ट्र मुख्य महासचिव मनिष साठे यांच्या आदेशानुसार वाशीम जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट सचिन पट्टेबहादूर यांनी नियुक्ती केली. तसेच वाशीम महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष म्हणून अनिता मनवर यांची महिला आघाडी महाराष्ट् प्रदेश अध्यक्षा नेहा शिंदे यांच्या आदेशानुसार नियुक्ती, युवा नेते रुपेश जी यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड, उभरते युवा नेतृत्व नरेश खडसे यांची मालेगाव तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती तसेंच महिला शहर अध्यक्ष म्हणून सीमा धबाले यांची निवड करण्यात आली. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारा आणि काशीरामजी साहेब यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी आझाद समाज पार्टी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. याच हेतुकोनातून वाशिम येथील आझाद समाज पार्टी मोठ्या उमेद आणि कार्यप्रणाली व पक्ष बळकटीसाठी कार्यकर्णी काम करेल याकरिता वरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रवेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आझाद समाज पार्टी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आदेश्या प्रमाणे व मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हा अध्यक्ष एडवोकेट सचिन पट्टेबहादूर आझाद समाज पार्टी वाशिम यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन जाहीर प्रवेश करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.