इतिहासाची साक्ष देणारा कौलवचा नदी घाट.

 इतिहासाची साक्ष देणारा कौलवचा नदी घाट.

कौलव येथे नदी घाटावर पुर दर्शक चिन्हे.

-----------------------------------

कौलव  प्रतिनिधी 

संदीप कलिकते

-----------------------------------

कौलव गावी भोगावती नदी घाट आपल्या पूर्वजांनी बांधला आहे.त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे.कारण असा बुरुज महाराष्ट्र राज्यात दुर्मिळ आहे.पंचगंगा घाट आणि श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील घाट यासारखा असणारा घाट पाच बुरुज ,शेजारी महादेव मंदिर निसर्ग रम्य वातावरण लाभलेला भोगावती नदीच्या शेजारील बुरुज कौलव गावातील महिला भगिनी आणि आंघोळ करणारे पुरुष ,जलतरण पट्टू यांना वरदान आहे.राधानगरी तालुका पावसाचा तालुका आहे.प्रचंड पडणाऱ्या पावसामुळे भोगावती नदीला पूर जून ,जुलै ,औगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वारंवार येत असतो.या पुराची तीव्रता दर्शवणारी संकेत हा बुरुज आहे.सध्या नदीला केवढे पाणी आहे तर मंडळी सांगतात.चार बुरुज बुडालेले आहेत.अधिक वाढल्यास कासवावर पाणी खेळते आहे.तर कांहीं वेळा पाणी महादेव मंदिर पिंडीवर आले आहे.तर कांहीं वेळा पाणी कमी असल्यास दीड बुरुज आहे असे सांगितले जाते.हे संकेत फक्त कौलव गावकऱ्यांना ओळखीचे आहेत.

कारण महापूर तीव्रता दर्शवणारे कुसेस किंवा अन्य परिणाम न वापरता कौलव मध्ये पूर्वापार रुजू असलेले पुराची तीव्रता मोजण्याचे संकेत हे आगळे वेगळे आहेत.दीड बुरुज म्हणजे कमी पाणी या पाण्यातून पलीकडे सहजासहजी चालत पलीकडे जाता येत नाही.पोहणारा फक्त पलीकडे जाऊ शकतो.अर्धा बुरुज पाणी म्हणजे नदीपात्रात कमी पाणी  या पाण्यातून पलीकडे  कोणीही सहज चालत सावकाशपणे जाऊ शकतो.तर चार बुरुज म्हणजे नदीच्या पुराचे  पाणी पात्राबाहेर पडलेले आढळते.नदीला आलेला  पूर असतो प्रचंड वेगाने वाहत्याले पाणी असते. कौलव गावकर्यांच्यात पूर मोजण्याचे आणखी एक गमतीशीर परिमाण म्हणजे बुरुजावर असलेले चवथ्या आणि पाचव्या बुरुजाच्या दरम्यान असलेले कासवाची मूर्ती.पाणी कासवावर आले म्हणजे राशिवडे ,हळदी बंधारे पाण्याखाली बुडालेले असतात.जसे पंचगंगा नदीच्या पुलावर महापूर निर्देशक मॅचिंद्री (मासा मूर्ती ) बुडल्या नंतर महापुराची तीव्रता मोठी मानली जाते तसाच शब्द प्रयोग कौलव गावातील लोक महापूर कालावधीत पाणी कोठे आहे.कासवाच्या शेजारी आहे की कासवाच्या वरती आले आहे.अशी विचारणा करतात.भोगावती नदीला आलेला महापूर ओळखण्याचे अजब असे चिन्ह संकेत कौलवकर मंडळींना मात्र नवलाईचे वाटत नाहीत परंतु नव्या पिढीला आणि बाहेरील गावच्या लोकांना नवलाईचे आणि थोडेसे वेगळे वाटतात.असा कौलव गावातील भोगावती नदी किनाऱ्यावरील घाट कित्येक पिढ्या पुराचा चिन्ह संकेत दर्शवणारा आणि सर्व ग्रामस्थांना वरदान ठरणारा राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.