बर्की धबधबा पर्यटनासाठी बंद वन खात्या कडून कडक बंदोबस्त.
बर्की धबधबा पर्यटनासाठी बंद वन खात्या कडून कडक बंदोबस्त.
------------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
------------------------------------------
शाहुवाडी : - कासारी खोऱ्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने व मेन रोड पासून दोन ते तिन लहान मोठे ब्रीज असून त्याच्यावर पावसाचेप्रमाण वाढले की लगेच पाणी येते आणि पर्यटक आगाऊपणा करून त्या पाण्यामध्ये शिरत असतात अशाच त्यांच्या आगाऊपणा मुळे वर्षाला एक ते दोन पर्यटक वाहुन गेल्याच्याघटना घडलेल्या आहेत याचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने दक्षता घेऊन वनमजुर बाळू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आर आर टीम चे किरण पाटील , अर्जुन पाटील , अनिल पाटील, योगेश गुरव, प्रकाश धुमाळ खास बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे तसेच कोणीही पर्यटकांनी पुढील आदेश मिळेपर्यंत इकडे फिरू नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे
Comments
Post a Comment