खळबळजनक :- मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर चंद्रपूर शहरात गोळीबार.
खळबळजनक :- मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर चंद्रपूर शहरात गोळीबार.
----------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि
मंगेश तिखट
----------------------------------------
पाठीमागून केला गोळीबार, चंद्रपूर च्या रुग्णालयात प्रार्थमिक उपचारानंतर नागपूर येथे पुढील उपचारासाठी नेले.
गोळीबार करतानाचा लाईव व्हिडीओ व्हायरलं, शहरात दहशत, आरोपी फरार.
शहरातील माध्यभागी असणाऱ्या आझाद बगीचा जवळील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये जुन्या वैमनशातून मनसेचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर जवळपास दुपारी 2.00 च्या दरम्यान अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली असून गोळीबार झाल्यानंतर आरोपी फरार झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनं ची चमू घटनास्थळी दाखल झाली व अमन अंदेवार यांना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर नागपूर ला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या गोळीबार प्रकरणाने शहरात दहशत पसरली आहे.
मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर झालेल्या गोळीवर प्रकरणाला मागील सन 2020 मध्ये बल्लारपूर येथील कोळसा व्यापारी सुरज बहुरीया याची भरदिवसा भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्या घटनेशी जोडले जातं आहे, बहुरिया हत्त्या प्रकरणात अमन अंदेवार यांच्यासह त्यांचे बंधू आकाश उर्फ चिन्ना अंदेवार, आल्फ्रेड उर्फ बंटी लॉजिस्ट अँथोनी, प्रणय राजू सैगल, बादल वसंत हरणे, अविनाश उमाशंकर बोबडे सर्व राहणार बल्लारपूर यांचा समावेश होता, या हत्येला दारुतस्करी आणि कोळसा तस्करीचे कारण असल्याचे म्हटल्या जातं होते. दरम्यान हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी अमन अंदेवार याने व्हाट्सएप स्टेटसवर ‘जंगल जंगल ही रहेगा, मगर शेर बदल जायेगा’ अशी पोस्ट टाकली होती त्यामुळे सुरज बहुरिया यांचा सुनियोजित कट होता हे स्पष्ट होते, या घटनेनंतर सुरज बहुरिया गैगने अमन अंदेवार यांना ठार करण्याचा मन्सूबा जाहीर करून खुलं आव्हान केलं होतं, हा वचपा काढण्यासाठी मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी याचं सुरज बहुरिया समर्थकांनी अमन अंदेवार यांचे बंधू आकाश उर्फ चिन्ना अंदेवार यांच्यावर याचं रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये गोळीबार केला होता आणि आता त्याची पुन्हा पुनरवृत्ती झाली असून आता अमन अंदेवार यांच्यावर त्याचं प्रकरणातून गोळीबार झाला की आणखी कुठले कारण आहे हे पोलीस तपासात समोर येईल मात्र या गोळीबाराने शहरात दहशतीचे वातावरण आहे.
वेकोली गौरी सास्ती कोळसा चोरी प्रकरणातून गोळीबार?
वेकोली गौरी सास्ती च्या कोळसा खाणीतून शैलेंद्र अग्रवाल यांच्या कोळसा डिओ च्या आडून कोळसा चोरी करणारी गैग सक्रिय असून काही दिवसापूर्वी एका सुरक्षा रक्षकाला मातीत गाडून ठार करण्यात आले होते, त्यात काही लोकं याचं अमन अंदेवार यांच्या विरोधी असल्याने त्यांची नावे पोलीस चौकशीत समोर येण्याची शक्यता वर्तवली जातं असतांना आता अमन अंदेवार यांच्यावर झालेला गोळीबार त्याचं कारणातून झाला का? हे पोलीस तपासात समोर येणार आहे.
Comments
Post a Comment