Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बीसीए करिता पुन्हा प्रवेश परीक्षा.

 बीसीए करिता पुन्हा प्रवेश परीक्षा.

---------------------------------- 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी 

 कमलेश ढेकाणे 

---------------------------------- 

वाई : चालू शैक्षणिक वर्षापासून बीसीए हा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून एआयसीटीई कडून मान्यता घेण्यात आली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची (CET) सामायिक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. यावर्षी ही परीक्षा 29 मे 2024 रोजी घेण्यात आली. मात्र बहुसंख्या विद्यार्थ्यांना याची कल्पना नसल्यामुळे ही परीक्षा दिलेली नाही. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे, शासनाने पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याचे ठरविले आहे.

त्याकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ३ जुलै २०२४ पर्यंत आहे. 


ज्या विद्यार्थ्यांना बीसीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी किसन वीर कॉलेजमद्ये बीसीए विभागात येऊन फॉर्म भरावा. त्याचबरोबर https://cetcell.mahacet.org/या संकेतस्थळावरही विद्यार्थी आपला सामायिक प्रवेश परीक्षा अर्ज भरू शकतात. असे आवाहन जनता शिक्षण संस्था, वाई संचलित किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.


यूजीसी आणि एआयसीटीईच्या निर्देशानुसार इ. १२ वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत पहिल्यादांच बीबीए व बीसीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा घेतली गेली. अनेक विद्यार्थ्यांनी सदरची प्रवेश परीक्षा दिली नसल्याने ते बीसीए प्रवेशापासून वंचित राहिले होते.

अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अतिरिक्त सामूहिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून सदर प्रवेश परीक्षाचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था महाविद्यालयात ३ जुलै २०२४ पर्यंत करण्यात आली आहे. तरी बीसीए मध्ये करिअर करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

Post a Comment

0 Comments