Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उचगाव येथे पाऊण लाखाची चोरी.अडीच तोळयाचे सोन्याचे दागिने लंपास

 उचगाव येथे पाऊण लाखाची चोरी.अडीच तोळयाचे सोन्याचे दागिने लंपास.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

-------------------------------------------

गांधीनगर:- उचगाव ता करवीर येथे बंद घराचे कटावणीच्या साह्याने कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने घरातील 75 हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. याबाबतची फिर्याद विष्णु दुधाप्पा चौगुले रा. आंबेडकर चौक उचगाव यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. 

याबाबतची पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी ,विष्णू चौगुले हे आपल्या कुटुंबीयांसोबत परगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घराचे कडी कोयंडा उचकटून घरातील अडीच ग्रॅम सोन्याची चेन, 15 ग्रॅम सोन्याची मोहन माळ, चार ग्रॅम सोन्याचे टॉप, नग दोन असे एकूण 75 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या चोरीची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन सावंत करीत आहेत.

Post a Comment

0 Comments