Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हातकणंगले विधानसभेवर भगवा ध्वज फडकवणेसाठी प्रयत्नशील.

 हातकणंगले विधानसभेवर भगवा ध्वज फडकवणेसाठी प्रयत्नशील.

------------------------------------------ 

हातकणंगले प्रतिनिधी

 विनोद शिंगे

------------------------------------------

लोकसभेत अल्पमतात झालेला पराभव हा आपल्या जीवारी लागला असून ,येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तो  निश्चित भरून काढला जाईल असा विश्वास माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी बोलताना व्यक्त केला.

        ते पेठ वडगाव तालुका हातकलंगले येथे लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी माजी आमदार व लोकसभेचे उमेदवार सत्यजित आबा सरुडकर हे होते. 

     यावेळी माजी आमदार  हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित आबा सुरडकर म्हणाले की हातकणंगले तालुक्यांनी माझ्या अपेक्षा पेक्षा जास्त मला मतदान केले आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच घटकांनी आपल्याला सहकार्य केले असून येणाऱ्या काळात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी आपण लागेल ते सहकार्य करू. परिणामी येणाऱ्या काळात विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी तयारीला लागा हातकणंगले विधानसभे साठी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांच्या उमेदवारीसाठी आपण पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करू असेही आश्वासन त्यांनी दिले. यावेळी हातकलंगले विधानसभा निवडणुकीची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांना देण्यात यावी अशी मागणी उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांनी आपल्या मनोगतातून केली.

     यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी बोलताना लोकसभेला केलेल्या सहकार्याबद्दल सर्व शिवसैनिकांचे व महाविकास आघाडीतील गटनेत्यांचे आभार मानले परिणामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे आदेश दिला तो शीर समान मानून काम केले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.

        यावेळी मा.आमदार सत्यजित पाटील आबा मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले ,महिला आघाडी जिल्हा संघटीका मंगलताई चव्हाण 

मा.सभापती प्रवीण यादव ,मा. जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण ,मा. पंचायत समिती सदस्य अरुण माळी 

महिला तालुका संघटीका उषाताई चौगुले ,उदय शिंदे, बाबासाहेब शिंगे, संदिप दबडे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments