दूधगंगा नदीच्या पुरामध्ये दोन म्हशींचा बुडून मृत्यू शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान.
दूधगंगा नदीच्या पुरामध्ये दोन म्हशींचा बुडून मृत्यू शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान.
---------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------------
राधानगरी तालुक्यातील पनोरी येथील शिवाजी रानमाळे हे म्हशींना पाणी पाजण्यासाठी दूधगंगा नदीमध्ये गेले असता पुराच्या पाण्यामध्ये दोन म्हशी पाण्यातून वाहून गेल्यामुळे त्यांचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
त्यामुळे शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले
याबाबत अधिक माहिती अशी की पनोरी येथील श्रीमती शांताबाई तुकाराम रावण यांच्या दोन म्हशी जावई शिवाजी पांडुरंग रानमाळे हे पाणी पाजण्यासाठी गावा शेजारी असणाऱ्या दूधगंगा नदीमध्ये दोन म्हशी घेऊन गेले होते त्यावेळी दोन म्हशी पाण्यामध्ये बुडून वाहून गेल्याने मृत्यू, झाला असून त्या म्हशी दूधगंगा नदीतून ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य कार्यकर्ते यांनी दोरीला बांधून बाहेर काढल्या त्यामुळे गरीब शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे या संदर्भात माहिती गोकुळच्या ऑफिसला कळवून त्याचा पंचनामा गोकुळचे अधिकारी यांनी केला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोकुळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
Comments
Post a Comment