अकिवाट जवानाचा अपघाती मृत्यू,अमर रहे अमर रहे शितल कोळी अमर रहे घोषणा देत जनसमुदायानी वाहिली श्रध्दांजली.

 अकिवाट जवानाचा अपघाती मृत्यू,अमर रहे अमर रहे शितल कोळी अमर रहे घोषणा देत जनसमुदायानी वाहिली श्रध्दांजली.

---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------
 अकिवाट ( ता. शिरोळ) येथील जवान- नायक, शितल कल्लाप्पा कोळी (वय ३०) यांचा शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजता अपघाती मृत्यू झाला. सुट्टीवर गावी आले असता अपघाताची ही घटना घडली. शनिवारी शासकीय इतमामात गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा वेळी अमर रहे अमर रहे शितल कोळी अमर रहे,भारत माता की जय घोषणा देत त्यांच्यावर रात्री १०:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोळी हे मध्य प्रदेशमधील पंधरा मराठी बटालियनमध्ये सेवेत होते. त्यांना नुकताच दुसरा मुलगा झाला त्याच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी ते पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आले होते. ४ डिसेंबरला ते परत मध्यप्रदेशला जाणार होते. रेल्वे आरक्षण करण्यासाठी मिरज येथे ते गेले होते. परतताना मजरेवाडी नजीक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, सरपंच विशाल चौगुले, सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय माने, जिल्हा सैनिक वेल्फेअर बोर्डचे पांगेसो,रमेश निर्मळे,केंदबा कांबळे, राजेंद्र देसाई, संभाजी पाटील,ए.वाय पाटील,समिर आरकाटे,संजय जंगम,बबन राजपुत,बाजीराव कोडग, लक्ष्मण निर्मळे,मोहन कोगे,संजय इंगळे, सेवानिवृत्त -भिमसेन माने, युवराज लाटवडे,महाविर दानोळे संदिप नरवाडे,विजय सनदी, अशोक कोळी सर, ग्रामसेवक-नंदकुमार निर्मळे,गावकामगार तलाठी-महेश साळवी,कुरूंदवाड पोलिस स्टेशनचे पी.आय -बालाजी भांगे,ए.आय-अमित पाटील, पत्रकार विश्वास कांबळे, रमेशकुमार मिठारे,रेस्कुफोर्सचे निलेश तवंदकर, कृष्णा भेंडे, सैनिक फेडरेशन शिरोळ तालुका पदाधिकारी व परिसरातील आजी -माजी सैनिक, ग्रामस्थांचा अथांग जनसागर मोठ्या संख्येने  उपस्थित होते.यावेळी सैनिक फेडरेशन कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षा सौ.रुपाली जुगळे(शिरगांवे) यांनी सुत्रसंचलन केले.कोळी यांच्या मागे पत्नी ,दोन मुले ,आई-वडिल ,भाऊ-बहिण, भावजय असा मोठा परिवार आहे.यावेळी एम एल आय इ चे जवानांनी शासकीय इतमामात मानवंदना दिली.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.