महादेवराव बी.एड.कॉलेज, तुर्केवाडी येथे 'भारतीय संविधान दिन उत्साहात संपन्न.

 महादेवराव बी.एड.कॉलेज, तुर्केवाडी येथे 'भारतीय संविधान दिन उत्साहात संपन्न.

----------------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------------

 तुर्केवाडी ता. चंदगड  दि. २६ नोव्हेंबर, २०२२ रोजी भारतीय संविधान दिनाचे आयोजन महादेवराव बी.एड.कॉलेज तुर्केवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. एन. जे. कांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागप्रमुख श्री.प्रधान ग. गो. हे होते.कार्यक्रमाची सुरवात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली.

'जगातील सर्वश्रेष्ठ मूल्यांची देण भारतातील प्रत्येक नागरीकांना संविधानाच्या माध्यमातून प्राप्त होते' त्यामुळेच भारताची एकता व एकात्मता अखंडपणे टिकून आहे असे प्रतिपादन मार्गदर्शक प्रा. प्रधान ग. गो. यांनी केले. भारतीय संविधान निर्मिती, कलमांचा अन्वयार्थ,भारतीय संविधान व शिक्षकांची जबाबदारी यासंदर्भात त्यांनी

सविस्तर मार्गदर्शन केले.

प्र. प्राचार्य श्री. एन. जे. कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधाननिर्मिती मधील महान कार्याला आढावा घेवून आज संविधान समजून घेवून संविधानबाबत सर्वांना जाणीव जागृती करण्याचे आवाहन केले. संविधानाचे काटेकोर पालन केले तर भारत सर्वश्रेष्ठ महासत्ता बनेल असे त्यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमावेळी मुंबईवरील २६/११/२००८

रोजीच्या दशहतवादी हल्ल्यातील शहिदांना व नागरीकांना आदरांजली वाहण्यात आली.

प्रशिक्षणार्थीनी बनविलेल्या भित्तीपत्रिका,चित्रपदर्शन यांचे उद्घाटन

श्रीम.देशपांडे एस.आर, व प्रा. श्री अभिषेक पोतदार

यांचे हस्ते करण्यात आले.

 तर महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. व्ही. पी. गुरव यांच Online प्रश्न मंजुषा घेण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थाध्यक्ष श्री महादेवराव वांद्रे , प्राचार्य एस.पी. गावडे, प्राचार्य अमर पाटील, प्रा.श्रीम.मनीषा सोहनी,श्री. व्ही.पी. गुरव, प्रा. सचिन कांबळे,श्रीम.देशपांडे एस.आर, व प्रा. श्री अभिषेक पोतदार हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षणार्थी उज्वला कांबळे यांनी केले तर आभार श्री मनोज जांबोटकर यांनी मानले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी श्रीम.सविता चौगुले यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.