बारा बलुतेदारांना बाजारपेठेत जागा द्यावी : नंदकुमार कुंभार.


 बारा बलुतेदारांना बाजारपेठेत जागा द्यावी : नंदकुमार कुंभार.

राहुल गांधी यांच्याकडे मागणी.

------------------------------------------

इस्लामपूर / प्रतिनिधी 

------------------------------------------

बारा बलुतेदार , अठरा पगड जातीतील लोकांचे सामाजिक प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. बारा बलुतेदार यांना बाजारपेठेत माल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दयावी.  कुंभार समाजातील लोकांना मातीवरील रॉयल्टी माफ असून सुध्दा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कुंभार समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली. 

      भारत जोडो या राहूल गांधीच्या हिंगोली येथील यात्रेत वाळवा तालुका आणि इस्लामपूर येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी सहभागी झाले होते. या यात्रेचे माजी मंत्री विश्वजीत कदम , विशाल पाटील , पृथ्वीराज पाटील श्रीमती जयश्रीताई पाटील , आ. विक्रम सावंत यांनी  नियोजन केले होते. यासाठी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील(दादा) साखराळेकर, शाकीर तांबोळी, बालम मोमीन, धनंजय कुलकर्णी, विजय पवार, उदय थोरात , अमित कुरळे , माजी प स आनंदराव पाटील , दिनकरराव पाटील,  सुहास पाटील, सलमान आवटी, संपतराव पाटील  यांनी अविरत प्रयत्न केले असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी सांगितले.

इस्लामपूर : भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना कुंभार समाजाच्या वतीने भेटवस्तू देताना नंदकुमार कुंभार , प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व इतर.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.