सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा.

 सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा.

------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------

विदयार्थी-नागरिक मोठया संख्येने सहभागी

सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.  संविधान रॅलीची' सुरुवात बिंदू चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.


यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे,  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी सचिन साळे, प्रांताधिकारी वैभव नावडकर,  शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रकांत साखरे उपस्थित होते. 

 

शाळा महाविद्यालयातील  विद्यार्थी व जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.


जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित नशामुक्ती भारत अभियानाचे उद्धघाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  कुशीरे येथील आश्रमशाळळेची विद्यार्थीनी कु. प्रज्ञा कांबळे हिने संविधानाविषयी आपले विचार व्यक्त केले. तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह कसबा बावडा येथील विद्यार्थीनी सई कांबळे हिने संविधानावर आधारित पोवाड्याचे सादरीकरण केले. 


संविधान दिनाच्या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. रेखावार व  पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून केले.


 रॅली बिंदू चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- कोल्हापूर महानगरपालिका - गगांराम कांबळे यांचे स्मारक असे मार्गक्रमण करुन पुढे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय चौकातून- दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन संविधान रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या नियोजनात डी.के शिंदे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.        

 संविधान रॅलीमध्ये जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, एन.सी.सी., एन.एस.एस, स्काऊट गाईड, विद्यार्थी तसेच सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय वसतिगृहे, आश्रम शाळामधील  पाच ते सहा हजार विद्यार्थी-विद्यार्थीनी पारंपारिक वेशभुषा परिधान करुन  तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक संविधान रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

रॅलीमधील विद्यार्थ्यांनी संविधानिक मुल्ये, संविधानाची कलमे, लोकशाहीची तत्वे, घोषवाक्ये, इत्यादी फलक सोबत आणले होते तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ संघ, लेझीम पथक, तसेच पोलीस बँडपथकासह रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. जिल्हास्तरावरील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या विषयांशी संबधित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, लाभार्थी मोठया प्रमाणावर सहभागी होते. शेवटी दसरा चौक येथे राष्ट्रगीत होऊन विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या वतीने खाऊ वाटप करुन संविधान रॅलीची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.