धनगर समाज व इतर जाती जमातीतील जात पडताळणी सर्टिफिकेट त्वरीत मिळावीत:प्रवीण काकडे.

 धनगर समाज व इतर जाती जमातीतील जात पडताळणी सर्टिफिकेट त्वरीत मिळावीत:प्रवीण काकडे.

-------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  

कराड प्रतिनिधी

-------------------------

धनगर समाज व इतर जाती जमातीतील मागासवर्गीयाची जात पडताळणी सर्टिफिकेट त्वरीत मिळावीत अशी मागणी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे  .एकेकाळी जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवणेसाठी विभागीय कार्यालयाकडे जावे लागत होते परंतु ही गैरसोय दूर करणेसाठी महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय उघडली परंतु जिल्हास्तरीय कार्यालयाकडून एखाद्या विद्यार्थ्यांस व्यक्तीस नोकरदार किंवा ज्यांना आवश्यक आहे अशांना सहजासहजी ''जात वैधता प्रमाणपत्र ''कास्ट व्हॅलीटीटी मिळाली असेल असे एकही प्रकरण दहा ते पंधरा वर्षांत आढळून आढळून आले नाही. एखादया राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यानी ३६  जिल्ह्यातील सामाजिक विभागाचा आढावा नुकताच घेतला होता ज्या जिल्ह्याच्या जातपडताळणी समिती कार्यालयात तक्रारी आहेत अशाची चौकशी करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त दिनेश डोके यांचे अध्यक्षतेखाली १० जणांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीत एक्स्पर्ट अधिकारी यांचे नेमणूका करणेत आले आहेत. ही समिती राज्यभर फिरून फिरून जिल्ह्यातील समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे या समितीच्या वतीने देण्यात आलेली जात पडताळणी प्रमाणपत्रे  बोगस प्रलंबित प्रकरणाची कारणे दक्षता पथकाचा कारभार शैक्षणिक प्रमाणपत्रे प्रलंबित तक्रार अर्जाची कारणे याचा आढावा घेण्यात येणार आहे. आतापर्यंत समाजकल्याण कार्यालयाचा कारभार हा मनमानी स्वरूपात केला जात असून विनाकारण सर्वाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी संबधीत अधिकारी यांनी प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी मागणी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी केली असून लवकरच महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील आधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.