रोडरोमिओं चिडीमारांचा आता होणार बंदोबस्त मलकापूर पोलिस दामिनी पथक सज्ज!

रोडरोमिओं चिडीमारांचा आता होणार बंदोबस्त मलकापूर पोलिस दामिनी पथक सज्ज!

--------------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
स्वप्निल देशमुख
जिल्हा प्रतिनिधि बुलढाणा
--------------------------------------------------------------------------

मलकापूर :- शहरातील विविध ठिकाणी. विघालया समोर रोड रोमिओ यांनी काही दिवसांपासून धुमाकूळ घातला असून त्या मूळे शाळेतील मूलांनी या समस्या निकाली काढण्यासाठी शहर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या कडे वारंवार दामिनी पथक नेमण्यात यावे अशी मागणी विविध स्तरांवर संघटना मागणी करत असतांना या प्रकरणी पोलिस निरीक्षक विजयसिंह  राजपूत यांनी या समस्यांवर गांभीर्याने विचार केला शहरात होणार्या घटनांची नोंद घेऊन शाळा महाविघालय परिसरात रोड रोमिओ मूलीना टर्गेट करतात शाऴेच्या आवारात गेटसमोर उभे राहून मूलीवर वाईट नजर टाकणे छेड काढणे यातून मूलीना त्रास सहन करावा लागतो अशा ऱोड रोमिओ आणि टवळखोरांचा समाचार घेण्या साठी पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 21-11-2022 रोजी सहायक पोलिस निरीक्षक स्मिता म्हसाये या पथकांची प्रमुख भुमिका बजावणार असून या पथकात महिला पोलिस आमलदार सविता मोरे, आदिती हुशारे, पोलिस आमलदार मंगेश संनगाडे, आनंद माने, वरिल प्रमाणे पथक तयार करण्यात आले असून आता रोड रेमिओ चिडीमार टवाळखोर पणा करणार्यांचा आता चांगलाच समाचार घेतला जाणार आहे ही समाधानाची बाब आहे.

बाँक्स महिला व मूलीना आवाहन 

मलकापूर शहरातील मोकाट रोडरोमिओ चिडिमार टवळखोरी करणार्या व घटकांना आळा घालण्यासाठी व, शाळेतील मूलीना या समस्या मधुन सूटका मिळावी व मुलीना या बाबत होणार्या अप्रिय घटना टाळण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे महिला मुलीना आवाहन करण्यात येत आहे की या प्रकरणी माइ्याशी संपर्क साधावा स्मिता म्हसाये सहायक पोलिस निरीक्षक  शहर पोलिस स्टेशन मलकापूर .


Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.