निर्यातदाराना आंतरराष्ट्रीय खरेदीदार शोधणे झाले आता सोपे नकुल बागकर कृष्णा व्हॅली चेंबर मध्ये निर्यातीवर चर्चासत्र संपन्न.
निर्यातदाराना आंतरराष्ट्रीय खरेदीदार शोधणे झाले आता सोपे नकुल बागकर कृष्णा व्हॅली चेंबर मध्ये निर्यातीवर चर्चासत्र संपन्न.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कुपवाड :
कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराषट्रीय खरेदीदार कसे शोधायचे या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रथम कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सदर चर्चासत्रासाठी ८६ लोकांनी सहभाग घेतला. उपस्थीतामध्ये उद्योजक, विविध कंपन्याचे एक्सपोर्ट प्रमुख, नवीन निर्यातदार यांनी सहभाग घेतला
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्रा. नकुल बागकर म्हणाले की जेव्हा आपणाला आंतरराष्ट्रीय खरेदीदार शोधायचा असतो तेव्हा बाहेरील देशामध्ये भारतीय लोकांची संख्या समजून घेतली तर आपल्या मालाला मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याची मोठी संधी मिळते. उदा. सांगलीची हळद अरबी राष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत जाते. हळद ही आयुर्वेदिक असल्यामुळे त्याची पाच्यात देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायाची मूलभूत समज, आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संधी ओळखण्यासाठी साधने आणि तंत्रे, निर्यातीसाठी परदेशी बाजारपेठ ओळखण्यासाठी साधने आणि तंत्र आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार ओळखण्यासाठी मूलभूत निकष या विषयावर सदरच्या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन केले.
फिओचे सहा. संचालक अक्षय शहा म्हणाले की, फ़िओ निर्यातदारांना खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य करत आहे. फ़िओचे ऑनलाईन पोर्टल जसे की, फ़िओच्या सेवा, इंडिअन ट्रेड पोर्टल आणि इंडिअन बिझनेस पोर्टल यावर आंतरराष्ट्रीय खरेदीदारांची माहिती दिली. तसेच हे पोर्टल कसे वापरावे हे सांगितले. पुढील काळामध्ये येणारे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि विदेशी व्यापार मेळावा यामध्ये निर्यातदार कसे सहभागी होतील याची पूर्णपणे माहिती दिली.
यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे संचालक राजगोंडा पाटील, दिनेश पटेल, उद्योजक सदाशिव साखरे, धनंजय पाटील, निलेश मालू, मिथिल झंवर, तन्मय शहा, यशोधन पाटील, विविध कंपन्याचे एक्सोपोर्ट प्रमुख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे व्यवस्थापक अमोल पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
Comments
Post a Comment