बाल हक्क सप्ताह निम्मित बाल हक्क परिषदेचे आयोजन.

 बाल हक्क सप्ताह निम्मित बाल हक्क परिषदेचे आयोजन.

----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र.

जितेंद्र गाडेकर.

जालना चिफ ब्युरो.

---------------------------------------------------

महिला  व बाल विकास कार्यालय ,  जिल्हा बाल संरक्षण कक्ष जालना व जिल्हा परिषद प्रशाला राणी ऊंचेगाव ता. घनसावंगी जिल्हा जालना यांच्या वतीने  जि प प्रशाला राणीउंचेगाव  ता. घनसावंगी जिल्हा जालना येथे बाल हकक अभियान सप्ताह अंतर्गत  बाल हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  

दि. 14 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान  देशभरात  बाल हक्क सप्ताह सर्वत्र साजरा करण्यात येतो. 

  जि प प्रशाला राणीउंचेगाव  ता. घनसावंगी जिल्हा जालना येथे बाल हकक अभियान सप्ताह अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांचे अधिकार , हक्क , कायदे व चाईल्ड हेल्पलाइन नंबर 1098 इत्यादी बद्दल मुलांना माहिती देण्यात आली. आजही समाजात स्त्रीभ्रूणहत्या ,  बालकामगार ,  बालविवाह ,  इत्यादी  समस्या समाजात आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी बालकांची जात , धर्म ,  वर्ण, वर्ग,  लिंग,  भाषा  यांचा विचार न करता जगातील प्रत्येक बालकाला सर्वांगीण विकासाचा हक्क असून ,  त्यांना सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध व्हावे या हेतूने संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर 1959 रोजी बालकाचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा प्रस्तुत केला आहे.  तेव्हापासून 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या बालहक्क संहितेत एकूण 24 कलमे आणि चार मुख्य अधिकार आहेत जगण्याचा अधिकार,विकासाचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार, सहभागाचा अधिकार हे बालकांचे मुख्य चार अधिकार आहेत.  भारताच्या संविधानामध्ये  वय सहा ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. कलम 23 मध्ये बालकाचे अपहरण व विक्री प्रतिबंध कलम 24 मध्ये बालकामगार प्रतिबंधता बाल हक्क करिता नमूद आहे. शिक्षणाचा अधिकार  2009 ,  पोक्सो ,  बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 ,  बालमजुरी प्रतिबंध कायदा 1986 या अधिनियमामुळे काही प्रमाणात स्त्रीभ्रूण हत्या , बालकामगार ,  बालविवाह , बालमजूर इत्यादी समस्यांवर बऱ्यापैकी नियंत्रण येत आहे. शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे. पालक बालविवाह प्रतिबंधक कायद्या बद्दल जागृत होत आहेत. बाल न्याय मुलाची काळजी व संरक्षण अंतर्गत बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हा महिला व बालकल्याण विभागामार्फत ग्राम तालुका व नगर बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आलेले आहेत. राज्यभरातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेला बालहक्क संरक्षण आयोग शासनाने स्थापन केलेला आहे. अशी माहिती  बाल न्याय मंडळ सदस्य जालना श्री आर बी जगताप यांनी दिली. तसेच  चाईल्ड हेल्प लाईन चे  श्री संतोष दाभाडे यांनी चाईल्ड हेल्प लाईनच्या कामा बद्दल मुलांना माहिती दिली.  गावामध्ये व इतर कुठेही शाळाबाह्य ,  बालमजूर मूल दिसेल , अपहरण केलेले ,  भीक मागणारी मुले किंवा जिथे कुठे बालविवाह होणार असेल अशी माहिती आपण चाईल्ड हेल्पलाइन 1098 ला देऊन या घटना रोखून बालकांना त्यांचे अधिकार मिळवून देऊ शकतो याबद्दल जनजागृती केली . बालक कुणाला म्हणतात , बाल विवाह म्हणजे काय , बाल मजुर कुणाला म्हणतात या बद्दल आनंददायी पद्धतीने  विविध  खेळ , गाणी , गोष्टीच्या माध्यमातून मुलांचा सहभाग घेण्यात आला. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मुख्याध्यापक श्री मोरे यांनी केले. बालहक्क सप्ताह बद्दल श्रीमती नूतन मघाडे यांनी मुलांना माहिती दिली. कार्यक्रमासाठी  श्रीमती माया कवानकर , श्रीमती कदम , श्रीमती अर्चना गूंगे , श्री. वाघ , श्री. कांबळे , श्री. खरात , श्री लाड ,  श्री कव्हळे, श्री पोपळघट हे उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.