बनावट अपघात प्रकरणात संबंधितांची झाडाझडती सुरू!
बनावट अपघात प्रकरणात संबंधितांची झाडाझडती सुरू!
----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर प्रतिनिधी
अन्सार मुल्ला
----------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथे एका अपघात प्रकरणात सी. आय. डी. मार्फत तपास सुरू आहे. या वादग्रस्त अपघातात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने तपास सुरू असून यामध्ये धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचे दिसून येते आहे. वडगाव पोलीस ठाण्यात दाखल अपघातात बनवेगिरी केल्याचे स्पष्ट झाले असून तपासात समोर येणार असल्याचे खात्री दायक समजून येत आहे.
या बनावट अपघातात प्राथमिक माहिती नुसार हे प्रकरण ज्या लोकांनी दाखल केला त्यातील पाच लोकांवर प्राथमिक स्वरूपात गुन्हा नोंद असून त्यांची चांगलीच झाडाझडती सुरू आहे. हे बनावट नुकसान भरपाईचे सम्पूर्ण प्रकरण कोल्हापूर येथील वकील नीलम एम. पोतदार यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले असून, विमा कंपनीला सदरच्या प्रकणात काही गोष्टी संशयास्पद आढळल्याने या प्रकरणाला वाचा फुटली पुढे या संदर्भात गुन्हा दाखल होऊन तपासाला सुरुवात झाली. या बनावट अपघातात अजून काही लोकांचा सहभाग स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण अशा प्रकारच्या गुन्ह्यात नुसते ज्याच्या नवे नुकसान भरपाई दावे दाखल करतात ते यातील काही टाक्यातील पैश्या मध्ये आदीच बांधून घेतलेले तक्रारदार असतात. या बनवेगिरी मध्ये काही खाजगी एजंट ज्या मध्ये सदरच्या वकिलांचा पती प्रशांत कांबळे जे की एका वकिलांचे क्लर्क आहेत त्याच्या वर देखील संशयाचे ढग जमा झाले आहेत. त्यांना मदत करणारे विमा कंपनी मधून मध्यवती निवृत्ती घेतलेले संतोष कुलकर्णी यांची तसेच पोलीस आणि बाबुराव उपाध्ये जे की अशा प्रकरणांमध्ये सर्वात जुने आणि सराईत एजंट म्हणून परिचित आहेत यांची नावे समोर येणार असल्याचे खात्रीपूर्वक समजत आहे. असली बोगस प्रकरणे न्यायालयात दाखल करणारे वकील असल्या शिवाय पूर्ण होत नाहीत. आमच्या पर्यात अतिशय खात्रीपूर्वक माहिती समोर येत असून पुढील भागात यातील आणखी महत्त्वाचे वृत्त प्रसारित करून अशा बनवेगिरी करणाऱ्या सर्वचे चेहऱ्यावर असलेले बुरखे जगा समोर उघडे पडणार आहेत.
Comments
Post a Comment