चांदीची पालखी अर्पण सोहळा संपन्न.

 चांदीची पालखी अर्पण सोहळा संपन्न. 


----------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------

 सांगवडे, ता. 24 : सांगवडे ता.करवीर येथे ग्रामस्थ भक्तजण पुजारी यांच्या सहकार्याने साकारलेली चांदीची पालखी श्री नरसिंह मंदिरात अर्पण सोहळा भाविकांच्या उपस्थित संपन्न झाला.

     पालखी सोहळ्यामध्ये नरसोबाच्या नावानं चांगभलं अशा निनादात, पारंपारिक मानाचे ढोल, धनगरी ढोल बारामतीच्या बँड हलगी घुमक्याच्या तालावर नाचणारे पाच घोडे तसेच 108 सुहासिनी महिला डोक्यावर कळस घेऊन सहभागी झाल्या तर मोहिते प्राथमिक शाळेच्या मुली आकर्षक वेशभूषा करून सहभागी झाल्या सांगवडे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून विविध व्यवस्था पाहत होते. त्यामध्ये त्यांनी पालखी मार्गावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या कचरा काढून स्वच्छता केली.सांगवडे सांगवडेवाडीतील बैलगाड्या आकर्षक सजवून सहभागी झाल्या. चांदीची पालखी सांगवडे फाटा ते संपूर्ण गावात फिरून नरसिंह मंदिरात आणण्यात आली सुमारे सहा ते सात तास झालेल्या या शोभायात्रेत पालखीचे आकर्षक सजावट केली होती.

      वारकरी संप्रदाय पांढरा सलवार परिधान करून टाळ मृदंगाच्या तालावर नाचत होते. संपूर्ण गावभर रात्रीपासून रांगोळ्या रेखाटल्या होत्या.यशराज घोरपडे ,आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधी पौराहीक विशाल जोशी यांनी केला. हजारो भाविकांनी  महाप्रसादाचा लाभ घेतला. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गोकुळ दूध संघाने केली होती. आमदार ऋतुराज पाटील यांनी मिरवणुकीत चांदीची पालखी ठेवलेल्या ट्रॅक्टरचे काही वेळ स्वारस्य केले.समितीतर्फे पालखीसाठी चांदी, रोख रक्कम व सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक प्रकाश पाटील, अजित नरके, आमदार ऋतुराज पाटील,माजी आरोग्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,आमदार प्रकाश आवाडे ,किरण दादा सांगवडेकर, अजय पाटील यड्रावकर , श्री नरसिंह देव देवस्थान ट्रस्ट सर्व सदस्य, सांगवडे व सांगवडेवाडी गावचे सरपंच ,उपसरपंच सदस्य ,पदाधिकारी, भाविक व गावकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.