दि. 18/12/2022 रोजीचे घुग्घुस ते मुंबई पायदळ मार्च आंदोलन तात्पुरते स्थगित..
दि. 18/12/2022 रोजीचे घुग्घुस ते मुंबई पायदळ मार्च आंदोलन तात्पुरते स्थगित.
---------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मंगेश तिखट
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
---------------------------------------------
सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर
घुग्घुस - ACC चांदा सीमेंट कंपनी घुग्घुस नकोडा जिल्हा चंद्रपूर येथील चार दलित कामगारांवरती गेल्या दहा महिन्यांपासून कामावरून काढून दिल्या बद्दल सफेद झंडा कामगार संघटनेचा माध्यमातून घुग्घुस चांदणी चौक येथे दि. 8/10/2022 पासुन आंदोलन सुरू असुन या आंदोलनाची दखल घेत दोन ते तीन मिटिंग घुग्घुस पोलीस स्टेशन येत घेण्यात आली असुन या आंदोलनाचा तोडगा निघाला नसल्याने सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना यांनी या आंदोलनाला तीव्रतेने वाडविण्यासाठी दि. 18/12 /2022 /घुग्घुस ते मुंबई पायदळ मार्च काडुन मंत्रालयासमोर बेमुदत धरने आंदोलन करु असा इशारा दिला होता.
परंतु जिल्हा कोर्टाने दि. 17/12/2022 रोजी समंस पाठवुन त्यांना दि. 26/12/2022 /ठिक 11:00 वाजता उपस्थित राहावे असे समंस पाठविण्यात आले असुन.
सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सांगितले की जर आम्ही घुग्घुस ते मुंबई ला आंदोलनासाठी निघालो तर आम्ही 26 तारखेला कोर्टात उपस्थित राहु शकणार नाही. व यामुळे कोर्टाचा अवमान होणार म्हणून आम्ही कोर्टाचा आदेशाचे पालन करत. हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहो. परंतु घुग्घुस ते मुंबई हे आंदोलन 26/12 /2022 रोजीचा नंतर आम्ही पुन्हा तीव्र भुमिका घेऊन आंदोलन करु व या आंदोलना मध्ये ACC चांदा सीमेंट कंपनीचा नारे बाजी करत पायदळ मार्च काढु व या आंदोलना मध्ये जे काही नुकसान व भरपाई चे जिम्मेदार हे स्वतः ACC चांदा सीमेंट कंपनी व शासन प्रशासनाची जबाबदारी राहील याची दक्षता कंपनीने व शासन प्रशासनाने घ्यावी असा देखील इशारा सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना यांनी दिला यावेळेस दत्ता वाघमारे अशोक आसमपल्लिवार शरद पाईकराव अशोक भगत जगदीश मारबते महेश शर्मा राकेश पारशिवे सोनु फुलकर ओम डोरलीकर कुणाल कामतवार सिध्दांत गुडदे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment