राधानगरी तालुक्यात 58 ग्रामपंचायतीसाठी 211 मतदान केंद्र,
राधानगरी तालुक्यात 58 ग्रामपंचायतीसाठी 211 मतदान केंद्र,
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
राधानगरी: राधानगरी तालुक्यात 58 ग्रामपंचायतीसाठी 211 मतदान केंद्र असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आलीतालुक्यात 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या त्यातील पडसाळी शेळवाडी मान बेट पाट पन्हाळा सोळांकुर आपटाळ ढेंगेवाडी केळोशी बुद्रुक आठ ग्रामपंचायतच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत तसेच 58 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या जागेसाठी 121 उमेदवार तर सदस्य पदाच्या 444 जागांसाठी 975 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकीसाठी एक लाख 5 हजार 318 मतदार मतदानाचा हक्क बजावतील व 55 हजार 594 पुरुष 49 हजार 717 महिला मतदारांचा समावेश आहे निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेसाठी 20 राखीव पथकाची व्यवस्था केली आहे अशी माहिती निवडणूक देण्यात आली.
Comments
Post a Comment