आजी, माजी सैनिक व नागरिक यांचेकडून कुमार विद्या मंदिर येथे जिल्हास्तरीय कुस्ती व धावणे स्पर्धेमध्ये खेळाडूंची निवड झालेल्या मुलांना मुलींना वही पेन वाटपाचा कार्यक्रम....
आजी, माजी सैनिक व नागरिक यांचेकडून कुमार विद्या मंदिर येथे जिल्हास्तरीय कुस्ती व धावणे स्पर्धेमध्ये खेळाडूंची निवड झालेल्या मुलांना मुलींना वही पेन वाटपाचा कार्यक्रम....
--------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------
टाकळीवाडी :-तालुका शिरोळ येथील कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी येथील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वही ,पेन, वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
25 किलो वजनी कुस्ती गटांमध्ये शिफा जमादार, 40 किलो वजनी कुस्ती गटामध्ये नीलम निर्मळे, 100 मीटर धावणे मध्ये सोहम निर्मळे, यांची जिल्हास्तरीय निवड झाली आहे.
यांना प्रेरणा मिळावी जिल्ह्यात चांगली कामगिरी करावी या हेतूने सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष व माजी सुभेदार केंदबा कांबळे, ऑर्नरी कॅप्टन रमेश निर्मळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाजीराव गोरे ,विद्यमान उपसरपंच बाळाबाई हक्के, सैनिक सुदर्शन शिरगुपे, सैनिक पांडुरंग निर्मळे, नेताजी कुंभार, राजू सुतार सर, सैनिक बाबासाहेब जुगळे, परशुराम बदामे, यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका यांची सुद्धा आभार मानले. व यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे पालक ,नागरिक ,गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते , आजी माजी सैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment