जागर फाउंडेशन आणि सुमन माळी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुडशिंगी येथे महिला सबलीकरण कार्यक्रमाचे आयोजन.
जागर फाउंडेशन आणि सुमन माळी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुडशिंगी येथे महिला सबलीकरण कार्यक्रमाचे आयोजन.
------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------
सांगवडे ÷ मुडशिंगी दी.13 जागर फाउंडेशन आणि सुमन माळी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुडशिंगी येथे महिला सबलीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी जितेंद्र कांबळे या होत्या. यावेळी बोलताना मांगले म्हणाले ,"मोठ्या गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या गरजा, जागा- जमीन, इमारत मशनरी आणि त्यासाठी लागणारे भांडवल आणि अशा मोठ्या उद्योगाप्रती बँकांची नकारार्थी भूमिका या सर्वावर उपाय म्हणजे परिसराच्याच गरजा ओळखून छोट्या मशिनरी खरेदी करणे आणि महिलांनी स्वयंपूर्ण बनणे हा आहे"."
आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील गरजा बघून त्यांची पूर्तता करणारे लाख दीड लाखाच्या किमतीचे छोट्या मशनरी आपण जर घेतल्या आणि त्यापासून छोटा घरगुती उद्योग जर सुरू केला तर किमान किमतीत गृहिणींना उद्योग सुरू करता येतील, परिसरातील लोकांच्या गरजा भागतील आणि दररोजचे रोख उत्पन्न मिळेल शिवाय त्यामुळे महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या मार्केटिंगचा प्रश्नही मिटेल. हा मार्ग महिला सबलीकरणाचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे, असं मला वाटतं." असं प्रतिपादन जागर फाउंडेशनचे अध्यक्ष बी जी मांगले यांनी केले. यावेळी कृषी खात्याचे अधिकारी श्री शिरोळकर यांनी अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांची माहिती सविस्तरपणे दिली त्यासाठी शासनाचे अनुदान 35 टक्के अनुदान मिळेल, असे सांगितले. शिवाय याची प्रकरणे कशी करावीत या संदर्भात सूक्ष्म माहिती आपल्या भाषणातून दिले दिली. यावेळी सुमन माळी महिला संस्थेच्या अध्यक्ष प्रा साळी प्रेमलतासाळी याने महिला सबलीकरणाची गरज आणि त्यासाठीचे मार्ग सुचवले. त्यानंतर सौ आशा गुरव, सौ.वैशाली गवळी ,पुनम कांबळे, मनीषा ढोणे, सी.आर.पी. ची भाषणे झाली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करवीर तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष भीमराव गोंधळी, अर्जुन गोंधळी, प्रल्हाद गोंधळी व त्यांच्या सहकार्याने केले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. शंकरराव कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले..!
Comments
Post a Comment