महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या "उपाध्यक्ष" पदी श्री.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या "उपाध्यक्ष" पदी श्री.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती.
---------------------------------------------------------------------------------
मुंबई दि.०१ : नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थाच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यास राज्य शासनाने केली आहे. आज "मित्र" संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात "उपाध्यक्ष" पदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत "विकसित भारत- भारत@२०४७(India@2047)" करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुद्धा सन २०४७ पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. या दृष्टीने महाराष्ट्र राजाची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. भारताच्या अर्थव्यवस्थे मध्ये महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सर्वात मोठी असून, देशाच्या सकल उत्पन्नामध्ये (GDP) राज्याचा वाटा १५% आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी भारत सरकारमार्फत कार्यरत असलेल्या नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्येही अशा संस्थेची स्थापना करण्याबाबतच्या सूचना नीति आयोगाकडून देण्यात आल्या. त्यानुसार नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थाच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यास शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली. "मित्र" संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात अध्यक्षपदी मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस अशी पदरचना यापूर्वी करण्यात आली आहे. आज शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने "मित्र" संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात "उपाध्यक्ष" पदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली.
मा.श्री.राजेश क्षीरसागर हे सध्या कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ, महाराष्ट्र राज्य (कॅबिनेट मंत्री दर्जा) या पदावर दि.१९ जून २०१९ रोजी पासून कार्यरत आहेत. दरम्यानच्या काळात या पदास न्याय देण्याच्या दृष्टीने आणि नियोजन विभागाचा आढावा घेण्याकरिता श्री.राजेश क्षीरसागर यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दौरा करून विभागीय स्तरावर नियोजन मंडळाच्या बैठका घेतल्या आहेत. या दौऱ्याद्वारे नियोजन मंडळाच्या अखत्यारीत असणाऱ्या जिल्हा नियोजन समित्यांचा कारभार सुधारण्यासाठी आणि शासकीय निधीचा वापर लोकोपयोगी विकासकामांसाठीच व्हावा, यावर अंकुश ठेवण्याची प्रामाणिक भूमिका बजावली आहे. याचा उपयोग कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीच्या काळात जनता, प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणे यामध्ये समन्वय ठेवण्यास झाला.
या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, राज्याचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करताना त्यातील मूळ उद्देश साध्य करण्याची मोठी जबाबदारी असून, या संस्थेच्या माद्यमातून अभ्यासपूर्वक काम करून राज्याच्या जलद व सर्वसमावेशक विकासाचा भाग होणे ही माझ्यासाठी मोठी संधी असणार आहे. नियोजन विभागाच्या कामकाजाशी संलग्न अशी मित्र या संस्थेची कार्यपद्धती असल्याने मित्र या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने मला माझी कार्यक्षमता सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. यासह नियोजन विभागातील कार्यपद्धतीच्या अनुभवावर ही जबाबदारी निभावणे मला सोयीस्कर होणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकरी अध्यक्ष पदी काम करताना राज्याच्या विकासाला चालना देण्यास उपाययोजीलेल्या उपक्रमांची दखल घेवून या पदावर आपली नियुक्ती झाली असून, या नियुक्तीबद्दल या संस्थेचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. मित्र संस्थेच्या झालेल्या नियुक्तीच्या माध्यमातून राज्याचा विकास साध्य करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रति,
मा. संपादकसो,
दै. -------------
वरील बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रसिद्ध करून सहकार्य करावे. हि विनंती.
आपला,
नंदू सुतार,
कार्यालय प्रमुख, शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर.
Comments
Post a Comment