महापालिकेच्या अभ्यासिका व ग्रंथालयाला आ.सौ.सुलभाताई खोडके यांची भेट विद्यार्थ्यांकरिता निवासी व भोजन व्यवस्थेबाबत प्रयोजन करण्याची सूचना चांगल्या सुविधा निर्माण करून अभ्यासिकेचा विस्तार करण्यावर भर-आ.सौ.सुलभाताई खोडके.

 महापालिकेच्या अभ्यासिका व ग्रंथालयाला आ.सौ.सुलभाताई खोडके यांची भेट विद्यार्थ्यांकरिता निवासी व भोजन व्यवस्थेबाबत प्रयोजन करण्याची सूचना चांगल्या सुविधा निर्माण करून अभ्यासिकेचा विस्तार करण्यावर भर-आ.सौ.सुलभाताई खोडके.

----------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------

अमरावती १२ डिसेंबर : अमरावती महानगर पालिका अंतर्गत विविध अभ्यासिका, ग्रंथालय व वाचनालय  चालविण्यात येतात . मात्र या ठिकाणी चांगली इमारत , वाचन कक्ष , व अन्य भौतिक सुविधा उपलब्ध असतांना याचा पुरेपूर लाभ विद्यार्थी वर्गाला होतांना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धावंत उमेदवार तसेच  पालक , शिक्षक , सेवानिवृत्त कर्मचारी, महिला व ज्ञानपिपासू बुद्धिजीवी वर्ग आदी घटकांचा महापालिकेच्या अभ्यासिका व ग्रंथालयाकडे कल वाढावा , जेणेकरून अमरावतीची वाचन चळवळ अधिक वृदिंगत होईल, यासाठी महापालिकेने योग्य नियोज़न करण्याची सूचना आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केली. 

अमरावती महानगर पालिकेच्या महिला व बालविकास विभाग द्वारा चालविण्यात येत असलेल्या आरटीओ समीपच्या संत  गाडगे बाबा प्रशासकीय प्रबोधिनी अभ्यासिका व ग्रंथालयाला आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच तेथील कामकाजाचा आढावा घेतला . अमरावती शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मनपाच्या वतीने सन २०१० पासून अभ्यासिका चालविली जात असून मुले व मुलांकरिता स्वतंत्र वाचन कक्षाची सोय आहे. याबरोबरच ग्रंथालयांचे बदलते स्वरूप लक्षात घेता याठिकाणी ई-लायब्ररी व संगणक कक्ष सुद्धा सुरु करण्यात आले. या ठिकाणीच्या दोन वाचन कक्षात जवळपास २०० विद्यार्थ्यांना बसण्याची सोय असून  पाच हजाराहून अधिक वाचन सामग्री उपलब्ध असल्याबाबत  मनपाचे महिला व बालविकास विभाग अधिकारी नरेद्र वानखडे यांनी आमदार महोदयांना अवगत केले . तसेच आतापर्यंत ३१९ विद्यार्थ्यांनी  स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले. दरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी अभ्यासिकेच्या संपूर्ण इमारतीची पाहणी करीत तेथील प्रस्तावित बांधकामाचा सुद्धा आढावा घेतला. याठिकाणी वरच्या मजल्यावर प्रशस्त असा तिसरा हॉल बांधण्यात येत असून यात जवळपास २२५ आसन क्षमता राहणार आहे. अभ्यासानुकूल वातावरण निर्मितीला घेऊन परिसरात छोटेशी निसर्गरम्य व शांततामय  अशी बाग साकारण्यात येत असल्याची माहिती मनपाचे उप-अभियंता  प्रमोद इंगोले व सहाय्यक अभियंता राजेश आगरकर यांनी दिली . यावर आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सदरची कामे गतीने व गुणवत्तापूर्वक करण्यात यावी , दर्जेदार आसन व्यवस्था , विद्युत व्यवस्था करण्यासह अभ्यासानुकूल वातावरण राहील, आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करण्याची सूचना केली. तसेच मनपाच्या अभ्यासिकेत प्रशस्त वाचन कक्ष, संगणक कक्ष , इंटरनेट सुविधा , ई-लायब्ररी , ऑनलाईन क्लासेस, तज्ञ मंडळींचे व्याख्यान, आदी सुविधा उपलब्ध करण्यावर भर द्यावा अशा सूचना केल्या. दरम्यान आमदार महोदयांनी अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला.

 मनपाच्या अभ्यासिका परिसरात अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करता येत असल्याने मनपाने याबाबत नियोजन करावे , बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी स्वरूपाचे प्रयोजन करता येऊ शकते, परिसरातच बीओटी तत्वावर उपहार गृह साकारून विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात भोजनाची  चांगली सुविधा उपलब्ध होऊ शकणार असून याबाबतही चाचपणी करावी, मनपा फंडातून विविध पुस्तके, ग्रंथ संपदा , मासिके , नियतकालिके उपलब्ध करण्यासह  शहरातील दानशूर व समाज सेवींच्या माध्यमातूनही पुस्तक संच व वाचन सामग्री मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अभ्यासिकेपर्यंत मनपाची सिटी बस सुरु करावी, सुरक्षा रक्षक तैणात करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत , अशा अनेक सूचना आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या वतीने करण्यात आल्या. अमरावती शहरात मनपाच्या अभ्यासिका व ग्रंथालयाच्या रूपात एक चांगली वास्तू साकारण्यात आली असल्याचे सांगून आमदार महोदयांनी याबाबत समाधान सुद्धा व्यक्त केले. शैक्षणिक जीवनात तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा फायदा होतो. वाचन संस्कृतीच्या प्रसारातही  ग्रंथालयाची मोलाची भूमिका असते. त्यामुळे आगामी काळात मनपाच्या अभ्यासिकेचा वापर स्पर्धावंत विद्यार्थ्यांबरोबरच पालक , शिक्षक , सेवानिवृत्त कर्मचारी, महिला तसेच सर्वच वाचकांना व्हावा, अभ्यासिकेचा विस्तार करण्यावर आपला अधिक भर राहणार असून मनपाने याबाबत नियोजन करून प्रस्ताव तयार करण्याची सूचना सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली. तसेच अभ्यासिकेचा विद्यार्थी रितेश काटकर याने इंडियन आर्मी व रोशन झुरमुरे याने महाराष्ट्र सुरक्षा बल (एम.एस.एफ.)ची परीक्षा उत्तीर्ण केल्या बद्दल आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   यावेळी आ.सौ. सुलभाताई खोडकेसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक  संजय खोडके,  मनपाचे महिला व बाल विकास अधिकारी-नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता-१-रविंद्र पवार,उप-अभियंता-प्रमोद इंगोले,सहायक अभियंता-राजेश आगरकर, कंत्राटदार-प्रशांत उपाध्ये,माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती-अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष-ऋतुराज राऊत, गजानन बरडे, अशोकराव हजारे, सुनील रायटे,पप्पूसेठ खत्री, आनंद मिश्रा, दीपक कोरपे, माजी नगरसेवक-भूषण बनसोड, रतन पहेलवान डेंडूले, ऍड. सुनिल बोळे, प्रमोद महल्ले, किशोर भुयार, योगेश सवई, किशोर देशमुख, जुम्मा हसन नंदावाले, प्रवीण भोरे, किशोर देशमुख, शुभम पारोदे, अमोल देशमुख, महेंद्र किल्लेकर, सतीश चरपे, चेतन वाठोडकर,निलेश शर्मा, मनोज केवले, संजय कुकरेजा, अजय उर्फ राणा देशमुख, प्रा. डॉ. अजय बोंडे, संदीप आवारे, कर्नालसिंग राहल,जयकुमार उर्फ बाळा नागे, प्रतीक भोकरे, प्रजवल भामोदकर, संकेत बोके, अभिजित लोयटे, प्रथमेश बोके,राजेश कोरडे,दिग्विजय गायगोले, अमोल साकुरे,विलास गुजर, प्रजवल शेंडे,प्रवीण चौधरी, लाभेश बडगुजर, प्रतीक भोकरे,आदीसह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.