प्रा. दिलीप देसाई यांना पीएचडी.
प्रा. दिलीप देसाई यांना पीएचडी.
------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
प्रा. दिलीप भाऊसाहेब देसाई यांना कॉम्प्युटर मॅनेजमेंट या विषयातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रदान करण्यात आली. ‘पौंगंडावस्थेतील मुलांवर मोबाईल गेमिंगमुळे होणाऱ्या परिणामांचे डेटा मायनिंग तंत्रज्ञानाच्या आधारे विश्लेषण’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. त्यांना प्रा. डॉ. अभिजीत काईवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. दिलीप देसाई हे केआयटीज आयएमईआरमध्ये गेल्या बारा वर्षांपासून एमसीए विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर दोन पेटंट प्रकाशित झाले आहेत. त्यांना केआयटीचे चेअरमन सुनिल कुलकर्णी, व्हाईस चेअरमन साजिद हुदली, सेक्रेटरी दीपक चौगुले, ट्रस्टी डायरेक्टर सचिन मेनन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांचे प्रोत्साहन लाभले.
Comments
Post a Comment