तारळे खुर्द ग्रामपंचायत दुरंगी लढत.

 तारळे खुर्द ग्रामपंचायत दुरंगी लढत.

-----------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कसबा तारळे प्रतिनिधी
विकास सरावणे
----------------------------------------------------------------

राधानगरी:-ग्रुप ग्रामपंचायत तारळे खुर्द निवडणुकीसाठी सत्ताधारी श्री चिंचमाई ग्राम विकास आघाडीसाठी माजी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या नियोजनानुसार ऍड. बी आर पाटील गट , ज्येष्ठ नेते सदाशिव पौंडकर गट , विद्यमान सरपंच आनंदा पाटील आणि रामचंद्र सरावणे यांच्या नेतृत्वाखाली तर विरोधी भैरवनाथ परिवर्तन विकास आघाडीसाठी शेतकरी संघाचे माजी संचालक मानसिंग पाटील आणि काँग्रेसचे युवा नेते नेताजी चौगले यांचा गट यांच्यामध्ये दुरंगी लढत होणार आहे .

 थेट सरपंच पदासाठी सत्ताधारी गटाकडून सरिता युवराज पौंडकर तर विरोधी आघाडीकडून अपर्णा मानसिंग पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे .एकूण नऊ सदस्य पदांच्या जागेकरता दोन्ही बाजूकडील अठरा उमेदवार रिंगणात उभे आहेत

 सत्ताधारी गटाकडून प्रभाग क्रमांक एक मधून अभिजीत पांडुरंग गायकवाड ,सागर दादू पाटील , मंदाकिनी बाजीराव पाटील तर विरोधी आघाडीकडून आनंदा श्रीपती सुतार , पांडुरंग तुकाराम पाटील , गीता प्रकाश बोचाटे यांच्यामध्ये लढत होणार आहे 

 प्रभाग क्रमांक दोन मध्ये सत्ताधारी गटाकडून शिवाजी विठू रोकडे , गीतांजली तानाजी शिंदे , आम्रपाली बाजीराव कांबळे तर विरोधी आघाडीकडून सुनील लक्ष्मण पाटील ,  मंगल दिनकर डाफळे ,प्रमिला युवराज कांबळे यांच्यामध्ये लढत होणार आहे .

तर प्रभाग क्रमांक तीन मधून सत्ताधारी गटाकडून सर्जेराव अशोक पाटील , मुक्ता विश्वास सरावणे , सुनीता अशोक गुरव तर विरोधी आघाडीकडून संग्रामसिंह शिवाजी पाटील ,अश्विनी सचिन सावंत ,शितल केरबा शेलार यांच्यामध्ये लढत होणार आहे .

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.