कुंभार समाजाचा राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा संपन्न!

 कुंभार समाजाचा राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा संपन्न!

-----------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------

कोल्हापूर:- आज दिनांक २५-१२-२०२२ रोजी उच्च तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य मा. चंद्रकांत दादा पाटील व मधुरिमा राजे यांच्या हस्ते संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पुष्प अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली संपुर्ण महाराष्ट्रात विखुरलेला कुंभार समाज एकत्र व्हावा व कुंभार समाजातील मुला- मुलींच्या लग्नासाठी होणारी वधू वराच्या पालकाची होणारी पायपीट थांबावी समाजाशी  आपली नाळ जूळावी आपला कुंभार समाज महाराष्ट्रात कुठे - कुठे आहे याची कुंभार समाजाला ओळख व्हावी यासाठी माजी नगरसेवक,व कुमावत क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रकाश कुंभार सरवडेकर माजी उपमहापौर अरुण आण्णा निगवेकर यांच्या प्रयत्नातून कुमावत को - ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोल्हापूर. कोल्हापूर शहर कुंभार. माल उत्पादक सोसायटी लिमिटेड कोल्हापूर, जिल्हा, कुंभार समाज विकास फौडेशन कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या वधुवर मेळावा मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुंभार समाजातील  250 मुले 75 मुलीनी या वधू-वर मेळाव्यात सहभाग नोंदवला पालकांची संख्याही लक्षणीय होती  संत गोरा कुंभार वसाहत मधील कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सोसायटीच्या हॉलमध्ये मध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उच्च तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य मा चंद्रकांत दादा पाटील,मधुरिमा राजे कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे चेअरमन,प्रकाश सरवडेकर, माजी उपमहापौर विलास वास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुमावत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हा चेअरमन विलास कुंभार , माझी उप महापौर कोल्हापूर महानगरपालिका अरुण आण्णा निगवेकर, संजय काका निगवेकर, दिनकर कुंभार,किरण माजगावकर, यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.