हुपरी रंकाळा व कोल्हापूर हलसवडे एसटी बसच्या फेऱ्या वाढवाव्या : वंचित बहुजन आघाडीची मागणी.
हुपरी रंकाळा व कोल्हापूर हलसवडे एसटी बसच्या फेऱ्या वाढवाव्या : वंचित बहुजन आघाडीची मागणी.
----------------------------------------
कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी
कु रजनी सचिन कुंभार
----------------------------------------
गांधीनगर:-हुपरी- रंकाळा तसेच कोल्हापूर- हलसवडे या एसटी बसच्या फेऱ्या वाढवून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडले अशा इशाऱ्याचे निवेदन कोल्हापूर एसटी नियंत्रक विभागाचे शिवाजीराव जाधव यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की रंकाळा हुपरी या एसटीने सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेच्या दरम्यान कॉलेजचे युवक युवती, कामगार वर्ग, व्यापारी, नागरिक, प्रवास करत असतात. त्यामुळे या वेळच्या एसटी फुल असतात. तसेच उंचगाव, गडमुडशिंगी, पट्टणकोडोली, तळंदगे, इंगळी, हुपरी, रेंदाळ या गावातील विद्यार्थी नोकरवर्ग कामगार मोठ्या प्रमाणात या रंकाळा एसटीने ये जा करतात. पण एसटीच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची गर्दी होते. काही वेळेस विद्यार्थ्यांना एसटी जागा न मिळाल्याने तासंतास ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा गैरफायदा खाजगी वाहतूक करणारे घेत असल्याने प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे. आणि वडाप मधून प्रवास करणे जीव घेणे असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कोल्हापूर हालसवडे या गाडीच्या फेऱ्यात वाढ करावी आणि रात्रीची रेंदाळ कमी असणारी गाडी पूर्वत सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुशप्पा, हरी कांबळे, पांडुरंग शिंगे, सुभाष कांबळे, अजिंक्य शिंगे, सर्जेराव कांबळे, चंद्रकांत कांबळे, गणेश जाधव उपस्थित होते.
हुपरी रंकाळा व कोल्हापूर हलसवडे या गावातील एसटी बसच्या फेऱ्या वाढवाव्यात या आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी ने एसटी नियंत्रण विभागाचे शिवाजीराव जाधव यांना देण्यात आले.
Comments
Post a Comment