शाहुवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वरिष्ठ महावितरण अभियंता कोल्हापूर यांना देण्यात निवेदन.

 शाहुवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वरिष्ठ महावितरण अभियंता कोल्हापूर यांना  देण्यात निवेदन.

---------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------

शाहूवाडी: स्वाभिमानी शेतकरी संघटना शाहूवाडी विभाग यांच्या वतीने विशालगड मांजरे फिडर वरून येळवण जुगाई, मांजरे, पारिवने, गेळवडे, शेंबवणे, मौसम, अनुस्कुरा, कुंभवडे ,गावडी, बर्की, कांटे, आणि बुरंबाळ या गावांना विजेचा वीज पुरवठा होत  आहे हा भाग अगोदरच डोंगराल असल्याने वारंवार वीज पुरवठा विविध कारणाने खंडित होत असतो त्यामुळे रात्री अपरात्री शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी महावितरण कंपनीने दिलेल्या वेळेत  तासंन तास  वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकाचे अतोनात नुकसान होत आहे तरी 

खंडित होणारा वीज पुरवठा वाढवून द्यावा म्हणून शेतकऱ्यांनी वेळोवेळी फोन द्वारे तसेच तोंडी मागणी करून ही /अधिकारी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे दिवसाचे नियोजन कोलमडून पडत होते ही बाब अत्यंत गंभीर असून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत  आणि यापुढे जेवढ्या वेळेत वीज खंडित होईल तेवढी वीज शेतकऱ्यांना वाढवून द्यावी या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता दीपक पाटील साहेब कोल्हापूर यांना स्वाभिमानी  शेतकरी संघटना कासारी खोरा यांच्या वतीने देण्यात आले तेंव्हा पाटील साहेब यांनी तातडीने लक्ष घालून मांजरे येथील ऑपरेटर आणि शाहुवाडी येथील शामराज साहेब यांच्या शी ताबडतोब फोनवरून संपर्क साधुन अर्ध्या तासाच्या वर जर विज खंडीत झाली तर ती ताबडतोब वाढवून द्यावी असे आदेश दिले  

 या मागणीचे निवेदन  विजय पाटील ,संजय केळसकर, बाजीराव सुळेकर, राजाराम शिवगण आणि लक्ष्मण बोडेकर आदी मान्यवराणी दिले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.