गुडाळ येथे महिलांच्या भजन स्पर्धा उत्साहात. गगनगिरी डुबलवाडी प्रथम क्रमांक!

 गुडाळ येथे महिलांच्या भजन स्पर्धा उत्साहात. गगनगिरी डुबलवाडी प्रथम क्रमांक!

-------------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे 
-------------------------------------------------------------------------
कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघ प्रणीत राधानगरी तालुका युवा कलाकार यांचेवतीने गुडाळ येथे घेण्यात आलेल्या महिलांच्या भजन स्पर्धा उत्साहात पार पडल्या असून गगनगिरी महिला भजनी मंडळ डुबलवाडी यानी प्रथम क्रम़ांक पटकावला. 

 ग्रामीण भागातील महिला घरचे आणी शेतीचे काम करून मिळालेल्या फावल्या वेळात आपल्या अंगातील असणाऱ्या सुप्त गुणांचे सादरीकरण अशा व्यासपीठातून मिळते हे समाधानकारक आहे हा लोककलाकार संचाचा आदर्शच आहे असे मत राज्यसंपर्क प्रमूख रामचंद्र चौगले यानी व्यक्त केले. 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं सदस्या संयोगिता पाटील ह्या होत्या उद्घाटन जिल्हाध्यक्षा अनिता मगदूम यानी श्रीफळ वाढवून केले.स्पर्धेचा निकाल असा प्रथम क्र. गगनगिरी महिला भजनी मंडळ डुबलवाडी पिरळ, द्वितीय क्र. विभागून विठूमाऊली भजनी मंडळ म्हाळूंगे व राधाई भजनी मंडळ बेलवळे खुर्द.||, ततीय क्र. विभागून  विठूमाऊली भजनी मंडळ म्हालसवडे व शिवप्रतिष्ठान भजनी मंडळ खेबवडे, उत्तेजनार्थ संत बाळुमामा भजनी मंडळ सरवडे. तर उत्क्रूष्ठ तबला महिला ऋतूजा अजित बागडी घोटवडे, भक्ती सुनिल लोहार, अनुष्का लहु हवालदार खेबवडे, उत्क्रूष्ठ गायन स्मीता संभाजी पाटील सरवडे,परिक्षण रविंद्र कवडे  व मारूती मुसळे कपिलेश्वर, हरिदास पाटील बेलवळे बू.|| रामचंद्र चौगले कुडूत्री यानी केले. 

  विजेत्याना रोख रक्कम, चषक व प्रशस्तीपत्र जिल्हाध्यक्ष विलासराव पाटील बेलवळेकर,  महिलाध्यक्षा अनिता मगदूम, तालुकाध्यक्ष पांडुरंग आवळकर, कार्याध्यक्ष सजना पाटील, अशोक पवार, सरपंच अशोक पाटील, उपसरपंच दत्तात्रय कोथळकर ग्रा.प. सदस्या स्ंयोगिता पाटील माजी उपसरपंच प्रकाश मोहिते, पत्रकार संभाजी कांबळे,राजेंद्र पुंगावकर, माजी उपसरपंच अश्विनी पाटील. युवा जिल्हाध्यक्ष प्रसाद माळवी यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश माळवी, विश्वास आडसूळे, बाजीराव पाटील वाडकर, संजय पाटील, राजेंद्र माळवी यानी परिश्रम घेतले. स्वागत सुत्रसंचलन निवेदक विश्वास आरडे यानी केले

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.