भ्रष्ट व पळपुट्या न पा प्रशासनाविरोधात आत्मदहनाचा इशारा.

भ्रष्ट व पळपुट्या न पा प्रशासनाविरोधात आत्मदहनाचा इशारा.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

जयसिंगपूर :प्रतिनिधी 

बाळासो वगैरे

 ------------------------------------

जयसिंगपूर नगरपालिकेतील  चार भ्रष्टाचाराचे विषय घेउन शिवपुत्र यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी मुलानी याना आत्मदहन करणार असलेच लेखी कळविले होते .तत्पूर्वी या भ्रष्टाचाराची चौकशी   करणेबाबत हि पत्रव्यवहार केला होता .मात्र मुख्याधिकारी मुलानी यांनी आपल्या जादुई डायरीत नोंद घेऊन मी करतो असे आश्वासन दिले होते .या जादुई डायरीतील लेख आपोआप गायब होतात फक्त आकडे शिल्लक राहतात या स्वभावाने भ्रष्टाचाराकडे कानाडोळा केलेने व्यथित होऊन शिवपुत्र यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे .

न पा ने पोलीस व शिवपुत्र यांचे सोबत बैठक घेणेचे तोंडी सांगून परस्पर पोष्टने पोलीस ठाणेस खुलासा सादर केला आहे .त्यावर शिवपुत्र यांनी खरमरीत उत्तर देऊन आत्मदहनाचा इशाऱ्यावर कायम असलेच घोषित केले आहे .यात २०१०  पासून आंदोलन सुरु आहे ,संदर्भाची यादी करणेस किलोमीटर कागद अपुरा पडेल असे नमूद करून न पा तील अधिकाऱ्यांची बेजाबदार व कर्त्यव्य कासुरात चव्हाट्यावर आणली आहे .

 सी स १७३२/४ रस्त्यावरील अतिक्रमण - १५/८/२२ रोजी मुख्याधिकारी यांनी सांगितले प्रमाणे मालू हाय स्कुल लगतचा शिवाजी हौसिंग सोसायटीने अतिक्रमण केलेला रस्ता खुला करीत असता रस्त्यात आडवी व एकतर्फा भिंत पाडनेस  कोर्टाची मनाई असलेचा  कांगावा करीत अतिक्रमण काढले नाही .रस्ता जनतेसाठी दुतर्फा खुला झाला नाही .ज़िल्हा कोर्टात ४४/२०१८ ने प्रलंबित दाव्यामध्ये सोसायटीची दावा मिळकत त्यांचे मिळकतीला  घातलेले कंपाउंड अशी आहे या मुद्याच्या ना पा ने दिलेल्या  खुलास्यामध्ये नमूद न्यायप्रविष्ट नसलेले बांधकाम कोणते हे नकाशात दाखविण्याची कुवत संबंधित अधिकाऱ्याची नाही .नगर रचना चे पद भूषविणाऱ्या बी  इ सिव्हिल ला मोजणी नकाशाचे वाचन करता येत नाही व प्लॉट मोजताना टेप देखील हातात पकडता येत नाही .सी स १७३२/१० लगत पूर्व पश्चिम रेष कश्याची व या प्लॉटचे मोजमाप किती हे तपासून पहा .या कारवाई वेळी स्टेडियम लगतचा कठडा फोडून काढला असलेचे खोटे उत्तर अधिकाऱ्याने यापूर्वी दिले आहे . दावा मिळकतीतील कंपाउंड कोणते हे नकाश्यात दाखविणेची कुवत अधिकाऱ्याच्या नाही   असे नगररचना खात्याची हजेरी घेतली आहे .

सी स १७३२/४ हि मिळकत नगरपालिकेच्या नावे आहे सोसायटीच्या नाही .अनेक वर्षे स्टे चा  बहाणा करणाऱ्या न पा वकिलांविरोधात मी १९/९/२२ तारखेस तक्रार कोर्टासमोर हजर राहून दिली . कोर्टाने १६/११/२२  रोजी दोन्ही पक्षाचे वकील व मला हजर राहणेस सांगितले .क्लार्क ला पेपर बुक मागविणेस सांगितले .१६/११/२२ तारखेस नगरपालिकेचे नाव पुकारले तेंव्हा न पा वकील हजर राहिले नाहीत .सोसायटी वकिलाने पुढील तारीख घेतली  याबाबत खुलासा न पा ने केला  नाही. 

सी स १७३२/४ रस्त्यावरील अतिक्रमण काढणेस स्टे आहे मग नगरपालिका या रस्त्यावर पेविंग कशी बसवू शकते या मुद्यावर न पा ने विकास  प्रस्तावित आहे म्हटले तर प्रस्ताव सादर कोणत्या नियमाने झाला असा प्रश्न उपस्थित केला आहे 

मुख्याधिकारी यांनी व्यक्तिशः मे  कोर्टाची भेट घेऊन शासकीय मोजणी नकाशात लाल रंगाने दर्शविलेले अतिक्रमण काढण्यास परवानगी घेणे कायदेशीर आहे ,पण मुख्याधिकारी टाळाटाळ करीत आहेत  याबाबत न पा चा खुलासा नाही.अतिक्रमणाची पूर्ण जबाबदारी मुख्याधिकाऱ्याची असते असा कायदा आहे .प्रत्यक्ष कारवाई वेळी मुख्याधिकारी मुलानी गैरहजर असतात .यापूर्वीचे मुख्याधिकारी श्री निकम स्वतः हजार असायचे . 

सी स १७३२/२ ते १७३२/४६  अनधिकृत बांधकामे - MRTP कायद्यानुसार सेट बॅक व FSI नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर नगरपालिका कारवाई करणेस टाळत आहे .शहरातील इतर नव्या जुन्या बांधकामांवर कारवाई करीत आहे .हा दुजा भाव नगरपालिका करीत असलेने मी आत्मदहन करीत आहे या मुद्याच्या  खुलास्यामध्ये न पा ने स्वतःचे गणिती अज्ञान पाजळाले आहे .एकूण मिळकती होतात ४५ तर केवळ तीन मिळकतीत नोटीस काढून  प्रकरण न्यायप्रविष्ट असता सर्वच मिळकतीवर कारवाई करणेस न्यायालयाची मनाई असलेच खोटे उत्तर दिले आहे 

सी स १७३२/२३ या बांधकामास न्यायालयीन स्टे आहे असे गेली बारा वर्षे सांगितले जाते .मूळ मालक मरून तिसरी पिढी आली तरी स्टे असलेचा बहाणा करीत नगरपालिका वेळकाढू पणा करीत आहे .३१/२०१७ या कोर्ट दाव्यात न पा प्रतिनिधी व वकील कोणीही हजर नसते व नव्याने बदल झालेली कागदपत्रे कोर्टाचे निदर्शनात आणून देत नाहीत याबाबत न पा ने खुलासा केला नाही .वकील आंबेकर व प्रतिनिधी तराळ यांची न्यायालयातील हजेरी नमूद तीन दाव्यात ऑनलाईन तपासून पहा असे शिवपुत्र यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांची पुराव्या सहित तक्रार केली आहे .

 न पा हौसिंग ते यादवनगर पाईप लाईन अफरातफर प्रकरणी कर्मचारी कुंभार याची कोणतीही चौकशी न पा ने केली नाही या मुद्यावर   तक्रार अर्जानुसार कोणतीही अहवाल विभाग प्रमुख मुश्रीफ यांनी दिलेला नाही ,केवळ बघ्याची भूमिका केली आहे .आत्मदहनाचा इशारा दिलेवर अचानक तक्रारीत तथ्य नाही असे उत्तर दिले आहे 

 जुना गट १५४/ क घरमालक रावसाहेब पाटील याचे कडून घरफाळा भाडेकरू नोंद प्रमाणे वसूल केला नाही या मुद्यावर न पा  खुलासा हा मूर्खपणाचा कळस आहे .नगरपालिकेने भाडे दिले त्यावेळी नागरपालिकेलाच माहित नव्हते .सध्याच्या स्थळ पाहणीत त्यावेळचा भाडेकरू कसा दिसणार .असे ज्ञान पाजळणारा विभाग प्रमुख वनखंडे पदास अपात्र आहे असे खरमरीत विधान शिवपुत्र यांनी केले आहे . 

   न पा ने दिलेला खुलासा हा कुंभार नामक एका भ्रष्ट व मागासवर्गीय समाजाचा द्वेष करणाऱ्या कर्मचाऱ्याने लिहून मुख्याधिकारी यांची परस्पर सही घेतले असलेचे नाकारता येत नाही .सी स १७३२/२ ते १७३२/४६ मधील ज्या बांधकामांना परवाना आहे ते सर्व परवाने न पा कर्मचारी कुंभार याने दिले आहेत .परवाना दिले नंतर मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम आहे कि नाही हे तपासून पाहणे त्याचे कर्तव्य होते . त्या कर्त्यव्यात कसूर केलेनेच सध्या तो पळवाट काढीत आहे .सी स १७३२/७ व १७३२/८ हे भिन्न प्लॉट असताना सामीलीकरण न करताच  बांधकाम परवाना दिला . बी डिमॉलीश नोंद  नकाशातील बांधकाम आजही अस्तित्वात आहे हा त्याच्या भ्रष्ट पणाचा पुरावा आहे .

सी स १७३२/१० ते १७३२/१७ धारकांनी रस्त्यावर केलेल्या बांधकामांना mrtp ची नोटीस कुंभाराने काढली मग त्या प्लॉट अंतर्गत बांधकामांना नोटीस  का नाही काढली असा प्रश्न शिवपुत्र यांनी उपस्थित केला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.