सातारा:-शासकिय कार्यालयात खाजगी ठेकेदाराचा वाढदिवस साजरा करणार्या अधिकारयावर कारवाई करा.

 सातारा:-शासकिय कार्यालयात खाजगी ठेकेदाराचा वाढदिवस साजरा  करणार्या अधिकारयावर कारवाई करा. 

------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------
सातारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दोन डिसेंबर रोजी खाजगी ठेकेदार विवेक मुचंडि यांचा वाढदिवस शासकीय नियमांची पायमल्ली करिता साजरा करण्यात आला.सदरप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  उप अभियंता या़ंचे कार्यालयात एका टेबलावर केक कापून  खाजगी ठेकेदार विवेक मुचंडि यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध अधिकारी, उप अभियंता तसेच टेंडर  क्लार्क  लावंड व इतर कर्मचारी हजर होते. सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारन विविध विभागांची आखणी करीत असते.

परंतु या कार्यालयातील अधिकारी वर्ग खाजगी ठेकेदार व धनदांडगे यांचे गुलाम झाले आहे. वास्तविक खाजगी ठेकेदार विवेक मुचंडि यांचा वाढदिवस शासकीय  कार्यालयात विनापरवाना केल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण झाला आहे म्हणून संबंधित अधिकारी यांचे वर  तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी म्हणून आमचे प्रतिनिधी यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.मा. जिल्हाधिकारी सातारा,मा.पोलीस अधिक्षक सातारा, मुख्य अभियंता, सार्व.बांधकाम विभाग पुणे, अधिक्षक अभियंता, सार्व.बांधकाम विभाग ‌सातारा यांना पण तक्रार दाखल केली आहे.


Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.