प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राधानगरी तालुक्यातील 153 विद्यार्थी गुणवंत यादीत.

 प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राधानगरी तालुक्यातील 153 विद्यार्थी गुणवंत यादीत.

---------------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
 विजय बकरे
---------------------------------------------------------------------------

राधानगरी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 153 विद्यार्थी गुणवंत यादीत आले असल्याची माहिती राधानगरी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बीएम कासार यांनी दिली

राधानगरी तालुक्या मध्ये शिष्यवृत्ती च्या प्राथमिक व माध्यमिक परीक्षेमध्ये 69 विद्यार्थी गुणवंत यादी बसल्या असून पुंगाव शाळेतील चौदा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आणि पाच विद्यार्थी नव विद्यालय कागल साठी पात्र बनवण्यात यश आले आहे व गुडेवाडी शाळे चा निकाल शंभर टक्के असून सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी तर एक विद्यार्थी नवोदय विद्यालय कागल साठी पात्र ठरला आहे खामकरवाडी शाळे ने सातत्याने सातत्याने सलग आठ वर्ष इयत्ता पाचवीच्या वर्गाला मार्गदर्शन राजाराम रायकर हे करत दरवर्षी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी बनवण्याचा सपाटा लावला आहे यावर्षी ही त्यांनी तब्बल नऊ विद्यार्थी गुणवंत धारक बनवले असल्याचे गटशिक्षणाधिकारी बीएम कासार यांनी सांगितले

प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गाववार विद्यार्थी संख्या खालील प्रमाणे कासार पुतळे चार एनी दोन मासुरली कन्या तुरंबे दोन आवळी बुद्रुक एक दुर्ग मा न वा ड एक मांगोली एक न्यू करंजे एक सोन्याची शिरोली एक येळवडे तीन कपिलेश्वर दोन कन्या शाळा, राशिवडे दोन ती टवे दोन बनाची वाडी एक गुडाळ एक पडळी एक कुमार राधानगरी एक नागेश्वर हायस्कूल राशिवडे तीन यशवंत हायस्कूल सोळंंकुर तीन मोरे हायस्कूल सरवडे दोन भोईटे हायस्कूल कसबा वाळवे दोन राधानगरी विद्यालय एक खो राटे हाय स्कूल सरवडे एक या शाळेच्या विद्यार्थी ना शिक्षकांना शिष्यवृत्तीची प्रश्नपत्रिका निर्मिती मोफत व प्रश्नपत्रिका संच पुरवणारे उदार देणगीदार आणि दरवर्षी स्वखर्चाने मार्गदर्शक शिक्षक गुणवंता धारक बनले असल्या चे गटशिक्षणाधिकारी बीएम कासार यांनी सांगितले

या शाळांना पंचायत समिती चे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी आर आर कुंभार अशोक पाटीस केंद्रप्रमुख एस ए पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे गटशिक्षणाधिकारी बीएम कासार यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.