न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड शाळेची शिष्यवृत्ती परीक्षा निकालाची परंपरा कायम
न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड शाळेची शिष्यवृत्ती परीक्षा निकालाची परंपरा कायम.
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
शैक्षणिक वर्ष 2021-22 वर्षात घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड चा विद्यार्थी अथर्व हणमंतराव सायमोते याने 300 पैकी 236 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. तसेच नदीम मुल्ला 210, आरुषी बेडगे 206, कु, सानिका डोंबळे 204, व रोहित चौरे 202 हे विद्यार्थी गुण मिळवून उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक अनिल शिंदे, स्पर्धा परीक्षा प्रमुख अमोल राठोड, आसावरी आरते यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक श्री.कुंदन जमदाडे यांचे प्रोत्साहन मिळाले. डॉ. संदिप पाटील, नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष- सूरज उपाध्ये, सेक्रेटरी रितेश शेठ, संचालिका - कांचन उपाध्ये, यांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला. यावेळी बाळासाहेब कोथळे, बबनराव कागले, हणमंतराव सायमोते, तसेच सर्व विभागाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित जोते. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कुपवाड व परिसरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment