महाराष्ट्र पोलीस रेझिंग दिवस उत्साहात संपन्न...
महाराष्ट्र पोलीस रेझिंग दिवस उत्साहात संपन्न...
--------------------------------------------------------------------------महाराष्ट्र पोलीस रेझिंग दिनानिमित्त आज देशभक्त आर. पी.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड मध्ये एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमान अविनाश पाटील साहेब आणि निर्भया पथक मिरज विभाग यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमाच्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस.के.ढेंगळे सर व पर्यवेक्षक श्री.ए.बी. आडमुठे सर यांनी केले.
आपल्या मनोगतामध्ये पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी पोलीस रेझिंग दिनाचे महत्त्व सांगितले. पोलिस रेझिंग दिनाविषयी त्यांनी यथोचित अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पोलीस दलामध्ये येण्यासाठी आवाहन केले आणि त्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे बौद्धिक, शारीरिक, मानसिक कष्ट घ्यावेत या प्रकारची अतिशय मार्मिक अशी माहिती दिली; त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यांना विद्यार्थ्यांना घेऊन एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला भेट देण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे निर्भया पथक मिरज विभागामधील श्री. जी.ए. पाटील, श्री. मोहसीन फकीर,सौ. महादेवी माने, सौ. संगीता ओंबासे यांनीही विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना निर्भया पथकाचे कामकाज कशाप्रकारे चालते याची माहिती दिली. त्याचप्रमाणे या पथकाअंतर्गत मुलींच्यासाठी, महिलांच्यासाठी कोणते कायदे आहेत याचीही विस्तृत माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांना कायद्याचे पालन करत वर्तणूक करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन आणि सूत्रसंचालन श्री.स.बा.बाबर सर यांनी केले.श्री.बी.जे. ठिकने सर आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment