जयसिंगपुरात पुन्हा एका महिलेचे मनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी केले लंपास.
जयसिंगपुरात पुन्हा एका महिलेचे मनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी केले लंपास.
------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शिरोळ तालुका प्रतिनिधी
राहुल कांबळे.
--------------------------------------------
जयसिंगपूर मध्ये 4 दिवसात घडलेली दुसरी घटना असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे तसेच जयसिंगपूर पोलिस यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहे)
काल दिनांक 16 2 2023 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास सौ जयश्री दीपक लंगरे वय वर्ष 52 राहणार गल्ली नंबर 15 शिरोळ वाडी रोड प्लॉट नंबर 2 सदर महिला शिरोळ वाडी रोड गल्ली नंबर 15 पासून क्रांती चौकाकडे चालत जात असताना जुन्या किरण हॉटेल शेजारी अचानक दोन अनोळखी इसमाने तोंडाला मास्क लावून काळा रंगाच्या स्प्लेंडरवर वरून अचानक हिसडा मारून सदर महिलेच्या गळ्यातील पंधरा ग्रामचे गळ्यातील मणी मंगळसूत्र लंपास केलेले ची घटना घडली. आहे.
यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तीने त्यातील निळसर काळपट रंगाचे टी-शर्ट घातलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र हिसडा मारून चोरले .त्या दोन्ही ईसमा पैकी काळा रंगाची स्प्लेंडर गाडी घेऊन निळसर रंगाचे जॅकेट घातलेल्या साथीदारासोबत फरार झाला आहे .सदर दोन्ही इसमानी तोंडाला मास्क लावला असल्याने चेहरा पट्टी समजली नाही याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की चोरून नेलेले गळ्यातील मनी मंगळसूत्र पंधरा ग्रॅमचे 70000 किमतीचे होते. यातील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्ह्याचा प्रथम खबरे अहवाल मे. न्यायालयात पाठवण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास या पोलीस उपनिरीक्षक टकले करीत आहेत.
Comments
Post a Comment