कुपवाडमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ.
कुपवाडमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ.
-----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
मिरज व कुपवाड शहराच्या विस्तारित भागासाठी 75 कोटींचा प्रस्ताव;
सुरेश खाडे
कुपवाड : मिरज शहर व कुपवाड शहराच्या विस्तारित भागाच्या विकासासाठी शासनाकडे नुकताच 75 कोटीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे लवकरच शासनाकडे पाठवलेला हा निधीचा प्रस्ताव मंजूर होईल यातून दोन्ही शहरातील विस्तारित भागातील विकास कामे मार्गी लावण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले.
कुपवाड शहरातील प्रभाग दोन मधील गुलमोहर कॉलनी येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राजारामबापू सोसायटी गुलमोहर कॉलनी विद्यानगर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंत्री खाडे पुढे म्हणाले की, महापालिका क्षेत्रात मिरज व कुपवाड शहरात बहुतांश भाग विस्तारित आहे या विस्तारित भागात अजूनही सुविधांचा अभाव आहे त्यामुळे या भागांच्या विकासाकडे लक्ष देण्याच्या उद्देशामुळे शासनाकडे नुकताच 75 कोटीच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कुपवाड शहरासाठीची ड्रेनेज योजना मार्गी लावली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होईल.
यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात नगरसेवक ढंग यांनी नागरिकांच्यावतीने विविध समस्या व प्रश्न मांडले. कार्यक्रमास, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मोहन व्हनकडे, नगरसेवक प्रकाश ढंग, प्रशांत खाडे पांडुरंग कोरे, कुपवाड शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, भाजपा कुपवाड शहराध्यक्ष रवींद्र सदामते, गुंडा माळी, अल्ताफ खतीब, सुहास पोळ, गणेश हिप्परकर, बाबासाहेब मुंजे, आप्पासाहेब पाटोळे, सागर माने, आजीज मुल्ला आदी उपस्थित होते,.
Comments
Post a Comment