शाहूवाडी तालुक्यातील शेेंबवणे, पैकी बौद्धवाडी या गावातील विजेचा पोल आला मोडकळीस,चप्पला झिजवून शेंबवणेकर झाले हैराण महावितरण करते दुर्लक्ष.
शाहूवाडी तालुक्यातील शेेंबवणे, पैकी बौद्धवाडी या गावातील विजेचा पोल आला मोडकळीस,चप्पला झिजवून शेंबवणेकर झाले हैराण महावितरण करते दुर्लक्ष.
----------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
शाहुवाडी :शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम विभागातील डोंगराळ भागात असणाऱ्या शेंबवणे गावातील बौद्धवाडी येथील विजेचा खांब मोडकळीस आलेला असुन. गेल्या सहा महिन्यांपासून बौद्ध वाडीतील ग्रामस्थ शाहूवाडी येथील महावितरण कार्यालयात खेपा मारून या घटनेची गंभीर बाब लिखीत स्वरुपात लक्षात देवून ही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने नवल व्यक्त केले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेंबवणेकर ग्रामस्थ महावितरणच्या मुख्य शाहूवाडी कार्यालयात जाऊन स्वतःच्या पायाच्या चप्पला शिजवत असतानाही त्याची दया मया या महावितरणच्या अधिकाऱ्यांना येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
तसेच सदरील पोल हा सामाजिक कार्यकर्ते बाबुराव नाथा कांबळे यांच्या घराशेजारीच हा मुख्य विजेचा पोल आहे.हा विजेचा पोल जीर्ण स्वरूपात झालेला असून तो कधीही पडून जीवित आणि वित्तहानी होण्याची मोठी शक्यता आहे.
या पुलामुळे बाबुराव राजाराम कांबळे व दिलीप आनंदा कांबळे यांच्याही घराला धोका आहे. या वसाहतीत 70 ते 80 लोक राहत असून विजेचा खांब कधीही कोसळून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे येथील सर्व ग्रामस्थ भीतीने त्रस्त झालेले आहेत. तसेच अनेक वेळा विजेच्या खांबाचे आवाज येत असल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण असून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वंचित बहुजन युवा आघाडीचे शाहुवाडी उपाध्यक्ष राहुल दगडू कांबळे यांनी या प्रकरणाची लिखित स्वरूपाची तक्रार शेंबवणेचे ग्रामसेवक तसेच मांजरे येथील महावितरण उप कार्यालय आणि शाहूवाडी येथील मुख्य वितरण कार्यालयात तक्रार अर्ज देऊनही त्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेंबवणेकर ग्रामस्थां
मधून संताप व्यक्त केला जात आहे. वंचितचे युवा नेते राहुल दगडू कांबळे हे महावितरणच्या कार्यालयात गेले असता, त्यांना तेथील अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देऊन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत, येत्या काही दिवसांत याप्रकरणी गंभीर दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराच शेंबवणेकर ग्रामस्थ यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment