उचगाव, गांधीनगरातील बेकायदा बांधकामप्रश्र्नी बेमुदत उपोषण सुरू.
उचगाव, गांधीनगरातील बेकायदा बांधकामप्रश्र्नी बेमुदत उपोषण सुरू.
--------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
उचगाव (ता. करवीर) येथील गट नंबर १७७/२ मधील भूखंडावर श्री वधवा यांच्या व गांधीनगर येथील सि.स.नं.१६५६ वर सुरू असलेल्या इंदरलाल कुकरेजा यांच्या बेकायदेशीर बांधकामावर तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष-आठवले गटाच्या वतीने शहराध्यक्ष अंकुश वराळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.
वधवा व कुकरेजा शासनाचे बांधकामा संदर्भातील विहित नियम व शर्ती यांचा भंग करून बेकायदेशीर बांधकाम करत असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊन बांधकाम जमीनदोस्त करण्यात यावे व संबंधित बांधकामधारक, कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी; ती न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तीन फेब्रुवारी रोजी अंकुश वराळे यांनी प्रशासनाला दिला होता. विहित कारवाई न झाल्याने वराळे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने या आंदोलनाची दखल घेतली असून संबंधित विभागांना याबाबत चौकशीअंती कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, उचित कारवाई करून वराळे यांना आंदोलनापासून परावृत्त करावे.
उचगाव व गांधीनगर येथील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई व्हावी, यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बेमुदत उपोषणास बसलेले अंकुश वराळे.
Comments
Post a Comment